रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 24 ऑगस्ट 2021 (10:57 IST)

टोकियो ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू बजरंग पुनियाला झटका बसला, गुडघ्याच्या दुखापतीमुळे या स्पर्धेतून बाहेर

टोकियो ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता कुस्तीपटू बजरंग पुनिया आगामी कुस्ती विश्व अजिंक्यपद स्पर्धेला मुकेल कारण त्याला टोकियो गेम्सच्या आधी उजव्या गुडघ्याच्या (लिगामेंट टियर) वर उपचार करण्यासाठी सहा आठवड्यांच्या रिहैबिलिटेशन सल्ला देण्यात आला आहे. कुस्ती वर्ल्ड चॅम्पियनशिप 2 ते 10 ऑक्टोबर दरम्यान ओस्लो, नॉर्वे येथे आयोजित केली जाईल आणि रिहैबिलिटेशन कार्यक्रम पूर्ण होईपर्यंत बजरंग प्रशिक्षण सुरू करू शकणार नाही. बजरंगने अलीकडेच एमआरआय केले होते आणि ऑलिम्पिकच्या आधी जूनमध्ये रशियामध्ये झालेल्या दुखापतीची गंभीरता जाणून घेण्यासाठी मुंबईतील कोकिलाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पिटलमधील स्पोर्ट्स मेडिसिन सेंटरचे प्रमुख तज्ज्ञांचा सल्ला घेतला.
 
बजरंग यांनी एका वृत्तसंस्थाला सांगितले, 'माझ्या लिगामेंटला इजा झाली आहे आणि डॉ.ने मला सहा आठवड्यांच्या रिहैबिलिटेशन करण्यास सांगितले आहे. मी कुस्ती जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी होऊ शकणार नाही. उर्वरित वर्षांसाठी रँकिंग स्पर्धा नाही. माझा हंगाम संपला आहे. या वर्षी कॅलेंडरमध्ये रेसलिंग वर्ल्ड चॅम्पियनशिप ही एकमेव मोठी स्पर्धा बाकी आहे. मी स्वताला या वर्षी इतर कोणत्याही स्पर्धेत भाग घेताना बघत नाही. 
 
जून महिन्यात टोकियो क्रीडा स्पर्धेपूर्वी रशियात अली अलीएव स्पर्धेत खेळताना बजरंगला दुखापत झाली होती. बजरंगने त्या स्पर्धेत अब्दुलमाजिद कुदीएव च्या विरुद्ध उपांत्य फेरीच्या सामन्यातून माघार घेतली जेव्हा प्रतिस्पर्ध्याने त्याचा उजवा पाय पकडला आणि सामन्याच्या पहिल्या कालावधीत त्याला खेचले. पायात वेदने मुळे बजरंगच्या उजव्या गुडघ्यावर परिणाम झाला आणि त्याने अडखळतच सामन्यातून माघार घेतली. तिने मात्र ऑलिम्पिकमध्ये भाग घेतला आणि 65 किलो गटात कांस्यपदक जिंकले.
 
बजरंग म्हणाले, 'हे माझे पहिले ऑलिम्पिक होते आणि ऑलिम्पिक पदक जिंकण्याचे माझे स्वप्न होते, टोकियोमध्ये मला वेदना असूनही मी खेळलो. मला ते करायचे होते. ' बजरंग म्हणाले की त्याला त्याच्या जॉर्जियाचे प्रशिक्षक शको बेंटिनिडिस यांच्यासोबत प्रशिक्षण सुरू ठेवायचे आहे. भारतीय कुस्ती महासंघाने अद्याप बेंटिनिडिसला नवीन करार न दिल्याने बेंटिनिडिस मायदेशी परतले आहे. परदेशी प्रशिक्षकांना नवीन कंत्राट देण्यापूर्वी निर्णय घेण्यापूर्वी कुस्ती महासंघ सर्व पैलवानांना भेटून त्यांची बाजू जाणून घेईल.बजरंग बेंटिनिडिस अंतर्गत प्रशिक्षण घेत होते, तर ऑलिम्पिक रौप्य पदक विजेता रवी दहियाचे वैयक्तिक प्रशिक्षक रशियाचे कमाल मलिकोव होते.

दीपक पुनियाचे प्रशिक्षक रशियाचे मुराद गेदारोव होते, ज्यांना कांस्य पदकाच्या प्ले-ऑफमध्ये रेफरीला मारहाण केल्यामुळे टोकियो ऑलिम्पिकमधून वगळण्यात आले होते.कांस्य पदकाच्या लढतीत दीपकला सॅन मारिनोच्या माईल्स नाझिम एमीनकडून पराभव पत्करावा लागला.त्यानंतर डब्ल्यूएफआयने गेडारोव्हचा करार रद्द केला. डब्ल्यूएफआयच्या सूत्रांनी सांगितले की,रवीचे प्रशिक्षक मलिकोव यांना नवीन करार मिळणे जवळजवळ निश्चित आहे आणि बजरंगने पूर्णपणे समाधानी नसतानाही बेंटिनिडिस सोबत प्रशिक्षण चालू ठेवायचे असले तरी फेडरेशन भारतीय कुस्तीपटूच्या विनंतीवर विचार करू शकतं.