गुरूवार, 2 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 8 ऑक्टोबर 2018 (09:30 IST)

युवा ऑलिंपिक स्पर्धा, तुषारला रौप्य पदक

youth olympics shooting
तुषार शाहू माने (१६) याने भारताला युवा ऑलिंपिक स्पर्धेतील पहिले पदक मिळवून दिले आहे. त्याच्या या पदकामुळे अर्जेंटीनाच्या ब्यूनस आयर्स येथे सुरू झालेल्या युवा ऑलिंपिक स्पर्धेत भारताने आपलं पदकांचं खातं खोललं आहे. नेमबाजीच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात तुषारने रौप्य पदकाची कमाई केली.
 
अंतिम सामन्यात अवघ्या 1.7 गुणांनी तुषारचं सुवर्ण पदक हुकलं. अंतिम सामन्यात त्याने एकूण 247.5 गुण मिळवले. तर रशियाच्या ग्रिगोरी शामाकोव याने 249.2 गुण मिळवून सुवर्ष पदक पटकावलं, आणि सर्बियाच्या अलेस्का मिट्रोविक याने 227.9 गुण मिळवून कांस्य पदक मिळवलं. तुषार माने हा एकमेव भारतीय नेमबाज या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पात्र ठरला होता.