मंगळवार, 2 डिसेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 26 जून 2018 (08:51 IST)

जिंका २५ हजारांचे बक्षीस, सरकारकडून निबंध स्पर्धेचे आयोजन

Wins 25 thousand prizes
मोदी सरकार आणखी एका स्पर्धेच्या माध्यमातून युवकांना 25 हजार रुपये कमवण्याची संधी देत आहे. सरकारने एक निबंध स्पर्धेचं आयोजन केलं आहे. शाळेच्या विद्यार्थ्यांपासून 25 वर्षाच्या युवकापर्यंत स्पर्धक या स्पर्धेत भाग घेऊ शकता. विजेत्याला यासाठी 25 हजारांचं बक्षीस दिलं जाणार आहे. 'अवेयरनेस प्रोग्राम ऑन इंडियन फॉरेन पॉलिसी'च्या थीमवर मोदी सरकारने निबंध स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धकांसाठी दोन श्रेणी आहेत. पहिली ज्यूनियर लेवल ज्यामध्ये 15ते18 वर्षाचे स्पर्धेक असणार आहेत. दूसरं वर्ग सीनियर लेवल, ज्यामध्ये 18 ते 25 वर्षाचे युवक भाग घेऊ शकतात. या स्पर्धेत भाग घेण्याची 31 जुलै ही शेवटची तारीख आहे. स्पर्धेत भाग घेण्याआधी नियम आणि अटी वाचून घ्या. www.Mygov.in वर जाऊन 'क्रिएटिव कॉर्नर'मध्ये तुम्ही ते पाहू शकता. 
 
ज्यूनियर गट - 'जलवायु परिवर्तन भारत की विदेश नीती के लिए अहम क्यों है'
 
सीनियर गट - 'क्या भारत की विदेश नीती हमारे विकास के लिए अहम है'
 
जूनियर लेवलच्या स्पर्धकांना 15 हजार रुपये पहिलं बक्षीस, 10 हजारांचं दुसरं बक्षीस आणि 5 हजारांचं तिसऱं बक्षीस असणार आहे. सीनियर लेवलसाठी पहिलं बक्षीस 25 हजार, दुसरं बक्षीस 15 हजार तर तिसरं बक्षीस 10 हजार रुपये आहे