Last Modified: दिल्ली , मंगळवार, 7 सप्टेंबर 2010 (16:19 IST)
आता दिल्ली पोलिसांकडे राष्ट्रकुल स्टेडियमचा ताबा
नवी दिल्लीत 3 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेला सुरक्षिततेबाबत कोणताही इशारा आलेला नसला, तरी एवढ्या मोठ्या स्पर्धेसाठी सुरक्षा व्यवस्था कडेकोट करणे अपरिहार्य आहे. स्पर्धेच्या सुरक्षिततेची संपूर्ण जबाबदारी दिल्ली पोलिसांवर आहे. सर्व स्टेडियमचा ताबा घेतल्यानंतर आम्ही आमच्या पद्धतीने सुरक्षा व्यवस्था राबविणार आहोत, अशी माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली.
80 हजार पोलिसांसह 15 हजार 500 निमसुरक्षा दल, 3 हजार कमांडो संपूर्ण दिल्ली शहरात तैनात करण्यात येणार असून लष्करालाही सज्ज राहण्यास सांगण्यात येणार आहे. पोलिसांनी स्टेडियमचा ताबा घेतल्यानंतर प्रत्येकाला काटेकोर तपासणीनंतरच स्टेडियममध्ये प्रवेश मिळणार आहे.