शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By वेबदुनिया|
Last Modified: नवी दिल्ली , सोमवार, 2 एप्रिल 2012 (13:17 IST)

गीताला ऑलिम्पिक तिकीट

महिला पैलवान गीताने भारतीय कुस्तीच्या इतिहासात नवा अध्याय लिहला. कझाकिस्तान येथे सुरु असलेल्या पात्रता फेरीत तिने अंतिम फेरीत पोहचून लंडन ऑलिम्पिकचे तिकीट मिळवले. ऑलिम्पिकमध्ये पोहचणारी पहिली भारतीय बनण्याचा मान गिताने मिळवला आहे. पात्रता फेरीत ५५ किलो ग्रॅम वजनगटात तिने दोन लढती जिंकल्या आणि अंतिम फेरीत प्रवेश केला. त्यामुळे तिचे स्पर्धेतील सुवर्ण किंवा रजतपदक निश्‍चित झाले आहे. स्पर्धेच्या सुवर्ण किंवा रजत पदक विजेता ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणार आहे.

त्यामुळे गीता ही ऑलिम्पिकमध्ये कुस्ती खेळणारी पहिली भारतीय महिला असेल. सन २00४ पासून कुस्तीचा ऑलिम्पिकमध्ये समावेश करण्यात आला आहे.