शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 27 डिसेंबर 2016 (17:25 IST)

११ वी अखिल भारतीय मविप्र करंडक स्पर्धा

मविप्र संस्था आयोजित ११ वी अखिल भारतीय मविप्र करंडक स्पर्धा मंगळवार दि १७ ते १९ जानेवारी २०१७ या कालावधीत संस्थेच्या कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृहात होणार आहे अशी माहीती स्पर्धा संयोजन समीती अध्यक्षा व संस्थेच्या सरचिटणीस श्रीमती निलीमाताई पवार व  कार्याध्यक्ष प्राचार्य डॉ.आर.डी.दरेकर यांनी दिली.   ही स्पर्धा मराठी , हिंदी , इंग्रजी या तीन भाषांमध्ये होणार असून स्पर्धेसाठी - १) नोटाबंदी-  आर्थिक क्रांतिची नांदी २) साहित्याचे नोबेल आणि भारत ३) योग , आयुर्वेद आणि मार्केटींग ४) रात्रंदिन आम्हा युध्दाचा प्रसंग ५) निरपेक्षता प्रसारमाध्यमांची ६) अमेरीका २०१६ - जग उजव्या वळणावर ? ७) दहशतवादाचे आंतरराष्ट्रीय संदर्भ असे एकुण ७ विषय निश्चित करण्यात आलेले आहेत.
 
कुठल्याही शाखेतील १२ वी उत्तीर्ण विद्यार्थी स्पर्धेत सहभागी होऊ शकतील . प्रत्येक स्पर्धकास (६+२) = ८ मिनिटे वेळ दिला जाईल . स्पर्धेत सहभागी होण्यासाठी २५ वर्षे कमाल वयोमर्यादा असेल . प्रत्येक महाविद्यालयास दोन विद्यार्थ्यांचा संघ पाठविता येईल.  विजेत्या स्पर्धकांना फिरत्या मविप्र करंडकासह प्रथम - २५ हजार  रुपये रोख , द्वितीय १५ हजार  रुपये रोख , तृतीय ११ हजार रुपये रोख व उत्तेजनार्थ ५ हजारांची तीन पारितोषिके दिली जाणार आहे. दिल्ली,आग्रा,पटना यासह महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यानी स्पर्धेसाठी नोंदणी केली आहे. अधिक महितीसाठी  स्पर्धा  समन्वयक डॉ.डी.पी पवार - ९८८१४५१८६६ , डॉ.वाय.आर.गांगुर्डे - ९४२३६९६७७७ यांच्याशी संपर्क साधावा .