रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. फिल्लमबाजी
Written By मनोज पोलादे|

सलमान खान

रोमॅंटिक हिरो

सलमान खान आजचा आघाडीचा नायक आहे. 'मैने प्यार किया' या पदार्पणातल्या चित्रपटाला मोठे यश लाभले. सलमान व भाग्यश्री ही जोडी एकदम हीट झाली. यातील प्रेम लोकांना आपलासा वाटला. त्यानंतर बडजात्यांच्या राजश्री फिल्सच्या प्रत्येक चित्रपटात सलमान 'प्रेम' म्हणूनच वावरला.

रोमँटिक हिरोच्या भूमिकेत तो एकदम फिट्ट बसला. सुरज बडजात्याच्या 'हम आपके है कौन' चित्रपटाच्या बाँक्स आँफिसवरील ऐतिहासिक यशाने सलमान खानला यशस्वी स्टार म्हणून प्रस्थापित केले. त्याचे साजन, जुडवा, करण अर्जुन, हम दिल दे चुके सनम, हे त्याचे चित्रपट खूप गाजले.

सलमान आज जवळपास सर्व आघाडीच्या दिग्दर्शकांबरोबर काम करणारा व्यस्त कलाकार आहे. सलमान म्हणजे चित्रपट हमखास चालणार याची शाश्वती दिग्दर्शकांना आहे.

सलमान खान आणि वाद हेही समीकरण आहे. ऐश्वर्या रायबरोबरच्या कथित प्रकरणात त्याने तिच्याशी अयोग्य पद्धतीने वागल्याच्या अनेक कथा प्रसिद्ध आहेत. मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवताना त्याखाली सापडून काही लोक मरण पावल्याचे प्रकरणही न्यायालयात आहे.

हम साथ साथ है या चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी राजस्थानात काळवीटांची शिकार केल्याप्रकरणी त्याला न्यायालयात खेचले आहे.


सलमानचे काही चित्रपट-


बाजीराव मस्तानी (आगामी), सलाम ए इश्क, बाबूल, जानेमन, क्योक‍ी, नो एन्ट्री, फिर मिलेंगे, मुझसे शादी करोगी, बागबान, तेरे नाम, ‍तुमको ना भूलं पायेगे, हर दिल जो प्यार करेगा, हम दिल दे चुके सनम, कुछ कुछ होता है, जुडवा, जीत, करण अर्जुन, हम आपके है कौन, साजन, मैने प्यार किया