बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. T-20 वर्ल्डकप-09
Written By भाषा|

पाक विश्वकरंडकचा दावेदार होता: कुंबळे

पाकिस्तान संघात प्रतिभाशाली खेळाडूंची कमतरता नाही. यामुळेच हा संघ विश्वकरंडक स्पर्धेचा खरा दावेदार होता, असे मत भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार अनिल कुंबळे याने व्यक्त केले आहे.

एका बेबसाइटवर लिहिलेल्या लेखात कुंबळेने म्हटले आहे की, पाकिस्तानने विजेतेपद पटकविल्याने अनेकांना आश्चर्य वाटले असेल. परंतु मला यामध्ये आश्चर्य वाटले नाही. मागील ट्वेंटी विश्वकरंडकमध्ये थोड्या फरकाने पाकचा पराभव झाला होता. यावर्षी त्याची सुरवात चांगली नाही. परंतु ते यशाचे हकदार होते. त्यांच्याकडे भारत आणि दक्षिण आफ्रिकेपेक्षा अनुभवी खेळाडू होते.