गुरूवार, 28 मार्च 2024
  1. धर्म
  2. »
  3. शीख
  4. »
  5. दहा गुरु
Written By वेबदुनिया|

गुरू अमरदेव साहेब

गुरू अमरदेव यांचा जन्म पंजाबमधील अमृतसर जिल्ह्यात ५ मे १४७९ रोजी झाला. वडिलांचे नाव तेजभान भल्ला तर आईचे नाव बख्त कौर होते. आईवडिल हिंदू धर्माचे उपासक होते व दरवर्षी हरिव्दारला भेट द्यायचे. माता मन्सादेवी यांच्याशी गुरू अमरदेव साहेबांचा विवाह झाला.

त्यांना चार पुत्र व कन्या होती. गुरूवाणीने प्रभावित होऊन ते गुरू अंगदसाहेबांना शरण गेले. यानंतर त्यांचा अध्यात्माचा प्रवास सुरू झाला. गुरू अंगदसाहेबांनी १५५२ मध्ये गुरू अमरदेव यांना गादी सोपविली. गुरू अमरदेव साहेबांनी सूत्रबद्धरित्या धर्माचा प्रसार व प्रचार केला.

देश व देशाबाहेरही त्यांनी शीख धर्मगुरूंना धर्माची शिकवण देण्यासाठी पाठविले. गुरू का लंगर परंपरेस त्यांनी बळकटी देऊन अगोदर पंगत नंतर संगत' हा मंत्र रूढ केला. गुरूंची भेट घेण्यासाठी सम्राट अकबरालाही याच प्रकियेतून जावे लागले.

गुरू अमरदेव साहेब यांनी आधुनिक विचारांची बीजे पेरली. सती प्रथेस त्यांनी विरोध करून विधवा विवाहास प्रोत्साहन दिले. त्यांनी रामदास साहेब यांना आपला उत्तराधिकारी नेमले. सप्टेबर १५७४ मध्ये त्यांची प्राणज्योत मालवली.