बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 08
  4. »
  5. बराक ओबामा
Written By वार्ता|
Last Modified: वॉशिंग्‍टन , बुधवार, 21 जानेवारी 2009 (12:18 IST)

शपथ विधीनंतर भाषण बंधनकारक नाही

वर्ष 1789 मध्‍ये अमेरीकेचे पहिले राष्ट्राध्‍यक्ष जॉर्ज वॉशिंग्‍टन यांनी पदभार स्‍वीकारल्‍यापासून आजपर्यंत बराक ओबामा यांच्‍यापर्यंत जेवढ्या राष्ट्राध्‍यक्षांनी शपथ घेतली त्‍यांनी शपथविधीनंतर भाषण दिले. मात्र अमेरिकन राज्‍यघटनेनुसार भाषण देणे बंधनकारक नाही.

वॉशिंग्‍टन यांनी दुस-या शपथ ग्रहण समारंभाच्‍या वेळी दिलेले भाषण हे आतापर्यंतचे सर्वांत लहान भाषण आहेत. त्‍यांचे हे भाषण केवळ 135 शब्‍दांचे होते.

तर आतापर्यंतचे सर्वा‍त मोठे भाषण विलियम हेन्‍री हॅरिसन यांनी दिले आहे. त्‍यांच्‍या भाषणात 8 हजार 445 शब्द होते. हॅरिसन यांचे हे भाषण 4 मार्च 1841 च्‍या कडाक्‍याच्‍या थंडीत मोकळ्या आकाशाखाली दिले होते. त्‍याचा परिणाम असा झाला, की एका महिन्‍यातच त्‍यांना न्‍युमोनिया होऊन त्‍यांचा मृत्यू झाला.

वॉरेन जी. हार्डिंग हे पहिले राष्ट्राध्‍यक्ष होते ज्‍यांचे भाषण लाऊड स्पीकर्सच्‍या माध्‍यमातून प्रसारित झाले होते. तर केल्विन हे पहिले असे राष्ट्राध्‍यक्ष होते. ज्‍यांचे भाषण देशभर रेडिओवरून प्रसारित केले गेले होते. आणि टीव्‍हीवरून भाषण प्रसारित झालेले पहिले राष्‍ट्राध्‍यक्ष हॅरी एस. ट्रूमन हे आहेत.