अवचिता परिमळू, झुळकला अळुमाळु
- संत ज्ञानेश्वर
अवचिता परिमळू, झुळकला अळुमाळुमी म्हणे गोपाळु, आला ते माये ॥१॥चांचरती चांचरती बाहेरी निघालेठकचि मी ठेलें काय करु ॥२॥ तो सावळा सुंदरु कासे पितांबरूलावण्य मनोहरु देखियला ॥३॥बोधुनी ठेलें मन तव जालें आनसोकोनी घेतले प्राण माझे गे माये ॥४॥बाप रखुमादेवी वरू विठ्ठल सुखाचातेणें काया मने वाचा वेधियलें ॥५॥