रविवार, 12 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. »
  3. सण-उत्सव
  4. »
  5. विठ्ठल
Written By वेबदुनिया|

पंढरीची वाट

WD
पालख्या, दिंड्या निघाल्या. भक्तिरसानं भारलेले वारकरी पंढरीची वाट चालू लागले. गावोगाव उत्साहानं त्यांचं स्वागत होत आहे. स्वागताचे विशाल फलक नेत्यांच्या फोटोसह जागोजाग मिरवत आहेत.

सांस्कृतिक वारसा म्हणून त्यांचं महत्त्व नक्कीच आहे. पण कोणतीही गोष्ट अतिप्रमाणात किंवा प्रमाणाबाहेर फोफावणं हे हानीकारकच नाही का?

वारकर्‍यांची संख्या दरवर्षी वाढते आहे. पुण्कर्म म्हणून त्यांना जेवू-खाऊ घालणारे अनेक भाविक वाटेतल्या प्रत्येक गावात असतात. पण त्यांच्यासाठी स्नानाची किंवा स्वच्छतागृहांची सोय नगण्च असते. पहाटेच्या वेळी उजाडणपूर्वी जागा सापडेल तिथे प्रातर्विधी उरकले जातात. त्या त्या गावातले रहिवासी आपल्या घराभोवती कोणी घाण करू नये म्हणून वारीच्या मुक्कामाच्या रात्री उशिरार्पत आणि दुसर्‍या दिवशी पहाटे चार-पाच वाजल्यापासून घराभोवती पहारा ठेवतात, हे वास्तव आहे. वारी निघून गेल्यानंतर गावातले रस्ते, मैदाने, झाडा-झुडपांभोवतीची अस्वच्छता किळसवाणी असते. स्वागताचे फलक झळकवणार्‍या पुढार्‍यांनी मोठ्या प्रमाणावर फिरती शौचालये पाण्याच्या सोयीसह पुरवण्याचे काम करायला हवे. जेवायला घालण्याइतकेच हे मोठे पुण्कर्म ठरेल. तसेच अशी सोय पुरवण्यासाठी त्याचा लाभ घेणार्‍यांनी पुरेसा मोबदला स्वखुशीनं द्यायला हवा. देवासमोर दान करणार्‍या रकमेतील काही वाटा या कामी वळवून स्वच्छतागृहांची सोय होण्यासाठी आग्रह धरायला हवा. वारी संपल्यानंतरही महिनाभर त्या मार्गाने बस किंवा रेल्वेने प्रवास करताना पंढरपूर स्टेशन जवळ आल्याचे वासावरून समजते. वारकर्‍यांची एवढी प्रचंड संख्या असूनही वारीतील शिस्त, व्वस्थापन या गोष्टी अभिमानाच आहेत. टाळ-मृदंगाच्या नादातील नामाचा गजर व भजनेही अध्यात्माची गोडी सांगणारी आहेत हे खरेच; पण स्वच्छतेचा अभाव या दोन्ही गोष्टी झाकाळून टाकणारा ठरतो.