गुरूवार, 2 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. विठ्ठल
Written By

आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी

pandharpur
आधी रचिली पंढरी | मग वैकुंठ नगरी || १ ||
 
जेव्हा नव्हते चराचर | तेव्हा होते पंढरपूर 
 
चंद्राभागेच्या तटी | धन्य पंढरी गोमटी || २ ||
 
जेव्हा नव्हत्या गोदा गंगा | तेव्हा होती चंद्रभागा
 
चंद्राभागेच्या तटी | धन्य पंढरी गोमटी || ३ ||
 
नामा म्हणे बा श्री हरी, ते म्या देखिली पंढरी 
 
चंद्राभागेच्या तटी | धन्य पंढरी गोमटी || ४ ||