झाला महार पंढरीनाथा
झाला महार पंढरीनाथा | काय सांगू देवाची मात ||
नेसला मलीन चीघोटी | घेतला हातामधे काठी ||
घोंगडी टाकिली पाठी | करी जोहार दरबारात || १ ||
मुंडाशात बांधिली चिठ्ठी | फेकीतो दुरुनी जगजेठी ||
दामाजीने विकली जी कोठी | त्यांचे दाम घ्यावे पदरात || २ ||
खळखळा ओतिला मोहरा | त्याची मोजून पावती करा ||
ढीग बघून चमकल्या नजरा | शहा घाली बोट तोंडात || ३ ||