आता विठ्ठलाच्या दर्शनासाठी ऑनलाइन बुकिंग
युगे अठ्ठावीस भक्तांच्या भेटीसाठी कर कटेवर ठेऊन विटेवर उभे असलेल्या विठ्ठलाच्या दर्शनास आषाढीत लाखो भाविकांची रांग लागते. सुलभ दर्शन घेता यावे, यासाठी मंदिर समितीने वेबसाईट बनविली असून, त्याद्वारे यंदाच्या आषाढीपासून दर्शन घेता येणे शक्य आहे. ही यंत्रणा कार्यान्वित झाल्याचे विठ्ठल-रूक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष अण्णा डांगे यांनी सांगितले. समितीची आषाढी नियोजन बैठक अध्यक्ष अण्णा डांगे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी रात्री झाली. यावेळी ते बोलत होते. www.vitthalrukminimandir.org संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आले असून, याद्वारे पददर्शन नोंदणी करून दर्शनाचा लाभ घेणे शक्य झाले आहे.