'चला जाऊ पंढरीच्या वारीला'
पंढरपुरच्या श्री विट्ठलाचा महिमा अपरंपार आहे. आजही लाखो भाविक आषाढी कार्तिकी पंढरपुरची वारी न चुकता करतात. परंपरेनुसार चालत आलेल्या हया वारीला लाखो भाविक तन मन धन विसरून विट्ठलाच्या चरणी लीन होतात. आषाढी वारीचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी कृणाल व्हिडीओने ' चला जाऊ पंढरीच्या वारीला' ही व्हिसीडी खास भाविकांसाठी बाजारात आणली आहे.निर्माते जयेष वीरा आणि भद्रिक वीरा यांनी निर्माण केलेल्या ' चला जाऊ पंढरीच्या वारीला' या व्हिसीडीमध्ये ' चला जाऊ पंढरीच्या वारीला','
आला हा वारा', ' चला पंढरीला जाऊ', ' देवा हो देवा पांडुरंगा', पंढरीनाथा विट्ठला', ' देवाची करूया आरती', ' पांडुरंगाचं सपनात दर्षन घडलं','
ताषा कडाडला', ' पांडुरंगाच्या कृपेनं', ' विट्ठल हरि ध्यान धरलं' ही भक्तीरसात तल्लीन करणारी प्रेक्षणीय व श्रवणीय गीते असून यात श्री विट्ठलाच्या आरतीचा समावेष करण्यात आला आहे. बाळ निकम यांनी दिग्दर्षित केलेल्या या व्हिसीडीची गीते राजेष बामुगडे यांनी लिहीली असून ती गायक विजय सरतापे, द्याकुंतला जाधव, नितीन तुपे, संजय सावंत, अमेय सावंत, नेहा राजपाल यांनी गायिली आहेत. संगीत संयोजन अषोक वायंगणकर यांनी केले असून नृत्ये वसंत हंकारे, संकलन निखिल ठक्कर व छायाचित्रण अजय कुरणे, निसार कादरी यांनी केले आहे. ही गीते कलाकार चैत्राली राजे, वसंत हंकारे, संजय नाषिककर, निलम जाधव, द्याषीकांत राणे, टिंवकल डिकोजा, मुनीफ मुश्रीफ यांच्यावर चित्रीत करण्यात आली आहेत. कृणाल कंपनीची ही व्हिसीडी विट्ठलभक्तांनी संग्रही ठेवण्यासारखी असून केवळ ४५ रूपयांत सर्वत्र उपलब्ध आहे.