1. धर्म
  2. »
  3. सण-उत्सव
  4. »
  5. विठ्ठल
Written By वेबदुनिया|
Last Modified: सोमवार, 11 जुलै 2011 (11:15 IST)

पंढरीचा वास आणिक दर्शन विठोबाचे..

आज आषाढी एकादशी वारकर्‍यांसाठी सोन्याचा दिवस. लाडक्या विठुरायाला भेटण्यासाठी ऊन, वारा आणि पाऊस याची तमा न बाळगता राज्याच्या कानाकोपर्‍यातून आठ लाखाहून अधिक वारकरी दाखल झाले आहे. सर्वत्र टाळ-मृदुंगाचा गजर, भजन, कीर्तन, प्रवचनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. अबालवृध्दांनी चंद्रभागेत स्नान करण्यासाठी गर्दी. र्शी विठ्ठल-रुक्मिणीच्या पददर्शन रांगेत 80 हजाराहून अधिक भाविक. दर्शन रांग सहा कि.मी. लांब. दर्शनासाठी 12 ते 14 तास लागणार आहे. रात्री गर्दी वाढल्यानंतर अधिक वेळ लागणार .

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि त्यांच्या पत्नी सत्वशीला चव्हाण यांचे हस्ते उत्तररात्री 2 वाजून 10 मिनिटांनी र्शी विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा. "राज्यातील जनतेला सुखात ठेव. पाउस वेळेवर आणि पुरेसा पडु दे,' असे साकडे यावेळी मुख्यमंत्र्यांनी विठ्ठलास घातले.