लाखो भाविकांच्या साक्षीने पंढरीत चैत्री सोहळा
दादासाहेब कदम
गरिबांचा देव म्हणुन देशासह परदेशातही ख्याती असणा-या पंढरपूरच्या श्री विठ्ठलाचा चैत्री एकादशीचा सोहळा पंढरीत लाखो भाविकांच्या साक्षीने संपन्न झाला. या सोहळ्यासाठी पंढरीत आलेल्या भाविकांनी विठ्ठलचरणी नतमस्तक होत वरूणराजाची कृपा होवुन दुष्काळी परस्थिती हटविण्याचे साकडे घातले. यासह यात्रानिमित्तने दरवर्षी भरणा-या जनावरांच्या बाजारावरही दुष्काळाचे सावट जाणवत असुन यामध्ये कवडीमोल किमतीत जनावरांची खरेदी विक्रि होत असल्याचे चित्र दिसत होते. आध्यात्माची दक्षिण काशी असणा-या विठुरायाच्य नगरीमध्ये सध्या भाविकांची चैत्र वारीसाठी गर्दी झाली असुन पंढरीमध्ये अनेक भागांमध्ये विठुरायाच्या नामाचा जयघोष सतत कानी पडत आहे. तर पंढरी दाखल होताच भाविक पांडुरंगाच्या दर्शनासाठी धावाधाव करीत आहेत. आणि ज्यासाठी केला अट्टहास तोच क्षण म्हणजे विठुरायाच्या दर्शनाचा क्षण समोर येताच त्याच्या नयनांना सध्या असणा-या दुष्यकाळाच्या झळया दिसाय लागुन तो भाविक आपल्या लाडक्या परमेश्वर पांडुरंगाला विठुराया....चारा पाणी तेवढ मिळु दे रे बा..बा..! असचं साकड घालीत असताना दिसुन येत आहेत. गत दोन पावसाळ्याच्या हंगामध्ये पाऊस कमी झाल्याने सध्या मोठ्या प्रमाणात चा-याची आणि पाण्याची टंचाई भासु लागली आहे. अनेक ठिकाणी जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठ्या स्वरूपचा झाला असुन काही भागात तर माणसांना पिण्यासाठी पाणी नाही तर जनावरांचे हाल काय होत असलतील याचा विचारच नको. तसेच अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात घटल्याने तेथे पाणी मिळविण्यासाठी भांडण तंटे लागत आहेत. एकुणच चारा पाणी टंचाई निर्माण झाल्यामुळे जनावरांसह माणसांनाही या सर्व गोष्टींच्या कमतरतेमुळे मोठे हाल सहन करावे लागत आहे. चैत्र वारीत पंढरीत येणारा भाविक विठुरायाच्या दर्शनाने सुखावला जात असला तरी तो आपल्या मनातील याबाबतची व्यथा पांडुरंगापाशी मांडताना दिसुन येतो आहे. कांदा मुळा भाजी, आवघी विठाई माझी म्हणणा-या शेतक-याची आवस्था तर या चारा पाणी टंचाईमुळे मोठी गहन झाली असुन तो या चैत्र वारीसाठी आला असता पांडुरंगाला आपल्या पाण्याविणा जळुन चाललेल्या पिकांची काहणी सांगतो आहे. काही काळ पांडुरंगाच्या या नगरीमध्ये तो जरी रमला जात असला तरी त्याच्या चेह-यावर असणारी शेतातील पिके जळण्याची नाराजी स्पष्टपणे दिसुन येते आहे. त्यामुळे या चैत्र वारीमध्ये सध्या सुरू असलेल्या पाणी आणि चारा टंचाईचे साकडे दर्शनावेळी विठुराया जवळ मांडल्याशिवाय गत्यंतरच उरले नाही. असाच भाव या शेतकरी भाविकांच्या मनामध्ये रेंगाळत आहे. पण हा भाविक आपल्या परमेश्वाराला आणखी एक कान गोष्ट सांगत आहे कि, पांडुरंग दर वर्षी काही प्रमणात का होईना ही पाणी व चारा टंचाई उद्भवत असते मग हे सरकार आणि पुढारी नेमके ऐन वेळीच का पळापळ करतात. त्यांना ही दैयनिय परिस्थीती निर्माण होण्यापूर्वीच काहीतरी उपाय योजना का सुचत नाही. विठुराया तु तरी या शासना आणि पुढा-यांना सुबुध्दी दे. सध्या सुध्दा यापेक्षा वेगळी काहीच परिस्थीती नसुन पाणी व चारा टंचाई सध्या गंभीर रूप धारण करू लागल्यावरच त्यांनी बैठका घेण्याची पळापळ लावली आहे. त्यांच्या बैठका होऊन सुविधा निर्माण होईपर्यंत जनतेचे या पाणी व चारा टंचाई मुळे किती हाल होणार कोण जाणे. म्हणुन विठुराया आता तुच या गंभीर समस्येतुन मार्ग काढ अथवा या शासना किंवा पुढा-यांना बैठका घेण्यापेक्षा काहीतरी जालीम उपाय सुचव म्हणजे माझी ही चैत्र सफल झाल्याचा आनंद मला व गुरा ढोरांनाही होईल.