रविवार, 26 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. विठ्ठल
Written By वेबदुनिया|

वारकरी संप्रदायाला पंजाबात नेणारेः संत नामदेव

शिंपीयाचे कुळीं, जन्मा माझा जाला | 

परि हेतु गुंतला | सदाशिवी ||
रात्रिमाजीं शीवी, दिवसामाजी शीवी |
आराणूक जीवीं | नाही माझ्या ||
सुई आणि सुतळी, कात्री गज दोरा |
मांडली पसारा | सदाशीवीं ||
नामा म्हणें शीवीं, विठोबाची आंगी |
म्हणोनियां जगीं | धन्य झालों |


संत नामदेवांनी या अभंगात सदाशिव या शब्दावर कोटी केली आहे. सदाशिव म्हणजे नेहमी पवित्र असलेला. नेहमी कल्याण करणारा शंभु महादेव आपण शिंप्याच्याकुळात जन्माला आलोअसल्यामुळे नेहमीच शिवण्याचे काम करतो. सदा-शिव म्हणजे नेहमीच शिवत असतो. रात्री शिवतो, दिवसा शिवतो, शिवण्याच्या कामाला विश्रांती अशी कधी नाहीच. सुई, दोरा, कात्री, मोजमापाची पट्टी असे सगळे साहित्य घेऊन सतत शिवतच असतो, असे सांगतासांगता शिंप्याच्या कुळात जन्मलेले नामदेव महाराज आपणास सहज सांगून जातात,

'नामा म्हणजे शीवीं, विठोबाची आंगी | म्हणोनियां जगीं | धन्य झालों ||

संत नामदेव हा खरोखर एक चमत्कारच आहे. त्यांनी त्यांच्या काळाच्या मानाने पुष्कळच पुढे राहील, अशी सुगम आणि सुरस अभंगरचना केली. नामदेवांनी जनीसारख्या एका दासीला आपल्या कुटुंबातीलच एक असे स्थान दिले. जीचे संतमंडळींतील महत्त्व ध्यानी घेता ती नामदेवांच्या कुटुंबातील इतर संतमंडळींच्या विषयात नेहमी तत्परता दाखविली आहे. ते ज्ञानेश्वर माऊलीबरोबर यात्रेला जातात, ज्ञानेश्वरांचया समाधीच्या वेळी स्वत: उपस्थित राहतात, इतर संतांबरोबर खेळीमेळीचे संबंध ठेवतात. बरोबरीने वागतात आणि चोखोबांसारख्या दलित समाजातील संतांचे अपघाती निधन झाल्यानंतर त्यांच्या उत्तरकार्यानंतरचे सोपस्कार स्वत: पुढाकार घेऊन व्यवस्थितपणे पार पाडतात. नामदेव हे संतांमध्येही आदर्श आहेत, असे म्हटले पाहिजे. त्यांनी भारतयात्रा या पंथाचा पूज्यग्रंथ 'ग्रंथसाहेब' त्यात नामदेवांची हिंदी पदे अंतर्भूत आहेत. नामदेवांबद्दल शीख पंथियांना अतोनात आदर आहे. नामदेव एका ठिकाणी लिहितात,

''हिंदु पुजे देहुरा मुसलमान मसीद |
नामें सोई सेव्या, जहाँ देहूराना मसीद ||
मन मेरी सुई, तन मेरा धागा |
खेचरजी के चरनपर नामा सिंपी लागा || ''

ह्याचा अर्थ हिंदूंची पूजा देवळात केली जाते, तर मुसलमान जमाज मशिदीत पढतात. नामदेव मात्र जेथे देऊळही नाही आणि मशीदही नाही, अशा ठिकाणी पूजा करतात. मनाची सुई आणि शरीराचा धागा म्हणजे दोरा घेऊन खेचरगुरुंच्या चरणी नामदेव शिंपी नम्र झाला आहे. नामदेव शिंप्याच्या कुळात जन्माला आले आणि त्यांनी आपल्या या व्यवसायाच्या माध्यमातून परमेश्वर पाहिला, अध्यात्म पाहिले, परमार्थ पाहिला आणि समतेची शिकवण महाराष्ट्रापासून पंजाबपर्यंत सर्वांना देत सगुण विठ्ठलाबरोबरच निर्गुण परब्रह्माची उपासना केली.

(साभारः महान्‍यूज)