सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. योग
  3. योग सल्ला
Written By
Last Modified: शनिवार, 30 जानेवारी 2021 (17:57 IST)

सूर्य नमस्कार करताना या चुका करू नका. फायदा होणार नाही

सूर्य नमस्कार बघणे खूप सोपं आहे परंतु या प्रक्रियेत काहीही चूक झाली तर या पासून फायदा मिळत नाही. सूर्य नमस्कारात 12 प्रकारचे आसन असतात. ज्यांना लक्षात ठेवणं सुरवातीला सहज नाही. हे आसन करताना चुका होणं सहज आहे. परंतु जर नियमानं सूर्य नमस्काराचा सराव केला आहे तर चुका होण्याची शक्यता कमी होते. चला जाणून घेऊ या की सूर्य नमस्कार करताना कोणत्या चुका करू नये.
 
1 घाई करणे- 
बऱ्याच लोकांची सवय असते ते लवकर लवकर सूर्य नमस्कार करतात. अशा परिस्थितीत चुका होणं स्वाभाविक आहे.हे करताना आपल्याला प्रत्येक आसनाला समान वेळ द्यावं लागेल.तसेच आपल्या श्वासावर देखील लक्ष द्यावे लागेल. जर आपण असं करत नाही तर आपले आसन योग्य प्रकारे होणार नाही आणि पूर्ण देखील मानले जाणार नाही. या मुळे आपल्याला त्याचा फायदा मिळणार नाही.
 
2 दोन आसन एकत्र करणे-
बऱ्याच वेळा लोक 12 आसनाचे नाव ऐकूनच आळस करतात .अशा स्थितीत  ते घाईघाईने दोन आसने एकत्र करतात. ते कोब्रापोझ आणि अपवॉर्ड डॉग फेसिंग पोझ एकत्र करतात. जर आपल्याला शरीराला सामर्थ्य मिळवू इच्छिता तर हे महत्त्वाचे आहे की आपण कोब्रा पोझ वेगळी आणि योग्य रित्या करावी. प्रत्येक आसन करण्याचे आपापले फायदे आहे.म्हणून ते योग्यरीत्या करावं.     
 
3 आसन पूर्ण करा- 
सूर्य नमस्कारा नंतर कोणते काम करावयाचे आहे त्यासाठी आसन अर्धवट सोडू नका. त्या पेक्षा आसन करूच नका. जेव्हा आपल्याकडे वेळ असेल तेव्हाच आसने करावी.अर्धवट केलेल्या सूर्य नमस्काराने आपल्याला फायदा न होता दुष्परिणाम भोगावे लागतील. जी पद्धत आहे त्यानुसारच आणि वेळेवर आसन करावं.
 
4 क्रमात बदल करू नका- 
आपल्या शिक्षकांनी आसनाचे जे  क्रम सांगितले आहे त्यानुसारच आसन करावं. जर आपण स्वतःहून काही बदल केले तर त्यामुळे आपल्याला शारीरिक त्रास होऊ शकतात. म्हणून 12 आसनाची जी प्रक्रिया आहे त्याला व्यवस्थितरित्या पूर्ण करा. कोणतेही आसन मधे सोडू नका. आणि जर चुकून विसरला असाल तर पुन्हा करायला वळू नका.