गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. योग
  3. योगासन
Written By
Last Modified: सोमवार, 6 सप्टेंबर 2021 (13:31 IST)

दररोज 10 मिनिटांचे ध्यान तुमचे जीवन बदलेल, हे रिसर्चमध्ये सिद्ध झाले आहे

भारतात मेड‍िटेशन म्हणजेच ध्यानावर जोर देण्यात येतं, आजही भारतातील लोक मानसिक शांती आणि त्यांच्या आंतरिक विकासासाठी ध्यान करतात.
 
ध्यान एकाग्रता वाढवण्याचे काम करते. संशोधनात हे समोर आले आहे. शास्त्रज्ञांनी 10 विद्यार्थ्यांवर संशोधन केले ज्यांनी 8 आठवडे दररोज ध्यान केले. हे विद्यार्थी आठवड्यातून 5 दिवस दररोज 10 मिनिटे ध्यान करायचे. संशोधनानंतर या विद्यार्थ्यांचे मेंदू स्कॅन करण्यात आले. स्कॅनिंग अहवालात असे दिसून आले की यामुळे मेंदूमध्ये असे बदल झाले  ज्यामुळे एकाग्रता वाढते.
 
न्यूयॉर्कच्या बिंगहॅम्प्टन विद्यापीठाचे संशोधक, ज्यांनी संशोधन केले, म्हणतात की ध्यान मेंदूचे ते दोन कनेक्शन जोडण्यांचा काम करतं जे एकाग्रतेने विचार करण्यास करण्यास प्रवृत्त करतं.
 
या संशोधनाचे निकाल संगणक धोरण तज्ज्ञ जॉर्ज वेंशेंक आणि न्यूरोइमेजिंग तज्ज्ञ यांच्यातील संभाषण आणि प्रयोगाच्या आधारे जाहीर करण्यात आले आहेत. डॉ.वेन्शेंक बऱ्याच काळापासून ध्यान करत आहेत आणि न्यूयॉर्कच्या नामग्याल मोनेस्ट्री संशोधन करत आहेत. या मठाचा संबंध सुप्रसिद्ध आध्यात्मिक गुरु दलाई लामा यांच्याशी आहे.
 
यासाठी डॉ.वेन्शेक यांनी 10 विद्यार्थ्यांवर 8 आठवडे संशोधन केले. संशोधनापूर्वी आणि नंतर या विद्यार्थ्यांचे एमआरआय करण्यात आले. मेंदूचे नमुने एमआरआयद्वारे समजले. ध्यानावरील संशोधनापूर्वी त्याचे मन एकाग्र झाले नसल्याचे अहवालातून स्पष्ट झाले. संशोधनानंतर मेंदूत एकाग्रता वाढल्याचे दिसून आले.
 
तुम्ही ध्यान कसे करता? ते कसे सुरू करावे? मी जमिनीवर बसावे का? अॅपसाठी मदत हवी आहे? कुठल्या मंत्राचा जप करावा? ध्यान शिक्षक आणि मानसशास्त्रज्ञ म्हणतात की प्रत्येकाची स्वतःची ध्यान करण्याची पद्धत असू शकते, म्हणून तुम्हाला जे योग्य वाटते ते लागू करा.
 
जेव्हा तुम्ही ध्यानाचा विचार करता तेव्हा मनात काय येते? एक कमळ पोज, योग चटई, सुंदर खोली? जर तुम्हाला सराव करणे आरामदायक वाटत असेल तर ते छान आहे. त्याच वेळी, काही लोक सरळ झोपणे किंवा खुर्चीवर बसणे पसंत करतात. आपले शरीर शांत आणि बळकट वाटते अशी पोज शोधणे हा उद्देश आहे.
 
एकूणच फक्त 10 मिनिटांचे ध्यान तुमचे जीवन सुंदर बनवेल. एकाग्र होईल आणि त्याचा परिणाम असा होईल की तुम्ही जे काही काम कराल ते अधिक चांगल्या प्रकारे केले जाईल.