गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. गणेशोत्सव
  3. अष्टगणेश
Written By वेबदुनिया|

अष्टगणेश : महोदर

महोदर इति ख्यातो ज्ञानब्रम्हाप्रकाशक:।
मोहासुरस्य शत्रुर्वै आखुवाहनग स्मृत:।।

महोदर नावाचा महान अवतार हा ज्ञान ब्रह्माचा प्रकाशक आहे. त्याला मोहासुराचा विनाशक आणि मूषक वाहन सांगितले आहे. प्राचीन काळात तारक नावाचा अत्यंत निर्दयी असुर होता. तो ब्रह्माच्या वरदानाने त्रैलोक्याचा स्वामी झाला होता. त्याच्या शासन काळात देवता आणि मुनी अत्यंत दु:खी होते. ते जंगलात राहून अत्यंत कष्ट सहन करत आपले जीवन व्यतीत करत होते. देवता आणि ऋषींनी बरेच दिवस शिवाचे ध्यान केले. भगवान समाधिस्थ असल्यामुळे त्यांनी माता पार्वतीची प्रार्थना केली.

पार्वतीने अत्यंत सुंदर भिल्लीणीच्या रूपात शिवाच्या आश्रमात प्रवेश केला. सुगंधित फुलांची निवड करताना शिवाला मोह पडेल याचीही ती काळजी घेत होती. तिच्या येण्याने शिवाची समाधी भंग पावली. त्या लावण्यवतीला लक्षपूर्वक पाहताच भिल्लीण अदृश्य झाली. तेथे देखणा असा कामदेव निर्माण झाला. पार्वतीची ही लीला असे समजून भगवान शंकर संतापले. त्यांनी कामदेवाला शाप दिला. या शापातुन मुक्त होण्यासाठी कामदेवाने महोदराची उपासना केली.

WD
महोदर प्रकट झाले. कामदेव त्यांची स्तुती करू लागले. महोदर प्रसन्न होऊन म्हणाले की, 'मी शिवाच्या शापापासून मुक्त करू शकत नाही, परंतु तुला राहण्यासाठी अन्य देह देत आहे'

यौवन स्त्री च पुष्पाणि सुवासानी महामते।

गानं मधुरसश्चैव मृदुलाण्डजशब्दक:।।

उदयानान‍ि वसंतश्च सुवासाश्चन्दनादय:।

संगो विषयसक्तानां नराणां गृहादर्शनम्:।।

वायुर्मुदु: सुवासश्च वस्त्राण्यपि नवानि वै:।

भूषणादिकमेवं ते देहा नाना कृता मया।।

तैर्युत: शंकरादीश्च जेष्यसि त्वं पुरा यथा।।

मनोभू: स्मृतिभूरेवं त्वन्नामानि भवन्तु वै।।


'महामते यौवन, स्त्री आणि पुष्प तुझा सुंदर वास आहे. गान, मकरंद रस, पक्ष्यांचा मधुर आवाज, उद्यान, वसंत आणि चंदनादी तुझे सुंदर आवास आहे. मनुष्याची विषयासक्त संगत, मंद वायू, नवीन वस्त्र आणि आभूषणे इत्यादी ही सर्व शरीरे मी तुझ्यासाठी निर्माण केली आहेत. या शरीराने युक्त तू पहिल्यासारखे शंकरादी देवतांचे मन जिंकू शकतो. अशा प्रकारे तुझे 'मनोभू' आणि 'स्मृतिभू' आदी नावे असतील. श्रीकृष्णाचा अवतार होईपर्यंत तू त्यांचा पुत्र प्रद्युम्न असशील.

WD

आणखी एक कथ

शिवपुत्र कार्तिकेयाने 'वक्रतुंण्डाय हुम्' हा सहा अक्षरी मंत्रजपाने गणेशाला प्रसन्न केले. गणेशाने का‍र्तिकेयाला वर दिला की, तू तारकासुरचा वध करशील. राक्षसांचे गुरू शुक्राचार्य यांनी मोहासुराला दीक्षा दिली आणि त्यांच्या आदेशानुसार मोहासूराने सूर्याला प्रसन्न करण्यासाठी निरंकार राहून अनेक वर्ष कठोर तपस्या केली. त्या तपामुळे संतुष्ट होऊन सूर्यदेव प्रकट झाले. सूर्यदेवाने त्याला आरोग्य आणि सर्वत्र विजयी होण्याचा वर दिला.

वर मिळाल्यानंतर मोहासुर गुरू शुक्राचार्यांकडे आला. त्यांनी त्याला दैत्यराजाच्या पदावर बसविले. त्याने त्रैलोक्यावर अधिकार गाजवायला सुरवात केली. त्याला घाबरून देवता आणि ऋषीमुनी जंगलात लपून बसले. मोहासुर आपली पत्नी मदिराबरोबर राहू लागला. नंतर भगवान सूर्याने गणेशाला प्रसन्न करण्यासाठी देवता आणि ऋषीमुनींना प्रेरीत केले. अत्यंत कष्ट सहन करत देवता आणि मुनींनी मूषक वाहनांची उपासना करण्यास सुरवात केली.

हे पाहून महोदर प्रसन्न झाले आणि त्यांनी देवता आणि मुनींना सांगितले की, 'तुम्ही निश्चिंत रहा, मी मोहासुराचा वध करेन.' मूषक वाहक महोदर मोहासुराशी युद्ध करण्यासाठी प्रस्थापित झाला असल्याची बातमी देवीश्रीने मोहासुराला दिली. त्याचबरोबर महोदराचे सत्य स्वरूप त्याला समजून सांगितले आणि त्यांना शरण जाण्यासाठी प्रेरीत केले. दैत्य गुरू शुक्राचार्यांनी देखील महोदराला शरण जाण्याचा सल्ला दिला.

तेवढ्यात विष्णू महोदराचा संदेश घेऊन उपस्थित झाले आणि त्यांनीही मोहासुराला समजावून सांगितले. मोहासुराने महोदराला आपण शरण आल्याचे सांगितले. त्यानंतर महोदराने मोहासुराच्या नगरीत प्रवेश केल्यानंतर त्याने त्यांचे अभूतपूर्वक स्वागत केले. त्याने महोदराच्या प्रत्येक आज्ञेचे पालन करण्याचे आश्वासन दिले. तेव्हा देवता आणि ऋषीमुनी प्रभु महोदराचे स्तवन आणि जयजयकार करू लागले.