रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2021
Written By
Last Modified: मंगळवार, 2 फेब्रुवारी 2021 (08:39 IST)

Rashi Parivartan 2021: हे तीन मोठे ग्रह फेब्रुवारीमध्ये त्यांच्या हालचाली बदलतील, याचा वृषभ आणि कुंभ राशीवर विशेष परिणाम होईल

ज्योतिषशास्त्रात यावर्षी फेब्रुवारी महिना खूप महत्त्वाचा मानण्यात येत आहे. फेब्रुवारी महिन्यात मकर राशीत सप्त ग्रह योग तयार होईल. त्याच वेळी, तीन अन्य प्रमुख ग्रह देखील त्यांची हालचाल बदलतील. ग्रहांच्या या राशी बदलांचा निश्चितच सर्व राशींवर काही प्रमाणात परिणाम होतो. ज्योतिष गणितानुसार सूर्य, शुक्र व मंगळ राशीचे परिवर्तन फेब्रुवारीमध्ये होणार आहे. फेब्रुवारीमध्ये कोणते ग्रह राशी बदलेल ते जाणून घ्या-
 
1. कुंभ राशीत सूर्याचे गोचर
12 फेब्रुवारी रोजी, सूर्य रात्री 9:03 वाजता आपली राशी बदलेल. मकर राशीतील आपला प्रवास संपल्यानंतर या दिवशी सूर्य कुंभ राशी प्रवेश करेल. या गोचरामुळे  कुंभ राशीच्या लोकांवर विशेष प्रभाव दिसेल. ज्योतिषांच्या म्हणण्यानुसार सूर्यदेव यांच्या कृपेने थांबलेले काम पूर्ण होईल.
 
2. शुक्राचे राशी परिवर्तन 
21 फेब्रुवारी 2021 रोजी, शुक्र सकाळी 2 वाजून 12 मिनिटाने मकर राशीतून निघून कुंभ राशीत प्रवेश करेल. शुक्राचे हे गोचर कुंभ राशीच्या लोकांना शुभ परिणाम देईल. यावेळी, कुंभ राशीसाठी देखील नवीन संधी आणि संपत्तीचे योग निर्माण होत आहे.
 
3. मंगळाचा गोचर 
22 फेब्रुवारी रोजी मंगळ आपली राशी परिवर्तन करेल. सकाळी 5 वाजून 2 मिनिटात मेष राशीतून वृषभ राशीत जाईल. वृषभ राशीत मंगळ ग्रहाचे राशी परिवर्तनामुळे अनेक राशींना शुभ फल मिळतील. या काळात आपल्याला संपत्तीचा फायदा देखील होऊ शकतो.