Biodata Maker marathi

Astrology Zodiac Horoscope Aquarius Chr.htm

Notifications

कुंभ कुंभ
स्वाभाविक वैशिष्ठे

कुंभ राशिच्या लोकांकडे प्रबळ नेतृत्व व मानसिक शक्ती आहे. आपल्यात दृढ इच्छाशक्ती आहे व आपण त्यासाठी कठोर परिश्रम करता. आपल्या प्रयासांच्या परिणामाबाबत आपण उत्सुक व धीर धरणारे असता. आपला स्वभाव मदत करण्याचा व सहानुभूती ठेवणारा आहे.

गरुड पुराण: चितेवर शरीर जळून राख होते, पण 'या' ५ गोष्टी आत्म्यासोबत जातात!

गरुड पुराण: चितेवर शरीर जळून राख होते, पण 'या' ५ गोष्टी आत्म्यासोबत जातात!मृत्यू हे या जगातील सर्वात मोठे आणि अटळ सत्य आहे. ज्याने जन्म घेतला आहे, त्याचा मृत्यू निश्चित आहे. हिंदू धर्मातील अठरा महापुराणांपैकी एक असलेल्या ‘गरुड पुराणात’ जीवन, मृत्यू आणि मृत्यूनंतरच्या प्रवासाचे अत्यंत सखोल वर्णन करण्यात आले आहे. आपण आयुष्यभर पैसा, घर, गाडी, मान-सन्मान आणि नातेवाईक जोडण्यात घालवतो. परंतु, जेव्हा प्राण शरीरातून निघून जातात, तेव्हा हे सर्व भौतिक सुख येथेच राहते. स्मशानात चितेवर आपले पंचमहाभूतांनी बनलेले शरीर जळून राख होते. मग मृत्यूनंतर आपल्यासोबत नेमके काय जाते? गरुड पुराणानुसार, शरीर नष्ट झाल्यानंतरही ‘या’ ५ सूक्ष्म गोष्टी आत्म्यासोबत पुढील प्रवासात जातात.