Biodata Maker marathi

Astrology Zodiac Horoscope Aries Hom.htm

Notifications

मेष मेष
घर-परिवार

मेष राशिच्या लोकांना आपल्या कुटुंबाकडून प्रेम व सन्मान मिळतो. त्यांच्याकडे फक्त कुटुंबातील नाही तर नातेवाईक आजूबाजूची लोक तसेच आपल्या समाजातील लोकही आदराने पाहतात. आपण आरामदायक व तीव्र आवाजापासून मुक्त घर पसंत करता. आपल्याला स्वयंपाकघरातील प्रत्येक वस्तु थोडा अव्यवस्थितपणा वाटला, तरीही सहजगत्या हाताला लागेल अशा ठिकाणी ठेवणे आवडते. घरात आपल्याला तीक्ष्ण आवाज आवडत नाहीत व शांत वातावरणाला आपण प्राधान्य देता.

गरुड पुराण: चितेवर शरीर जळून राख होते, पण 'या' ५ गोष्टी आत्म्यासोबत जातात!

गरुड पुराण: चितेवर शरीर जळून राख होते, पण 'या' ५ गोष्टी आत्म्यासोबत जातात!मृत्यू हे या जगातील सर्वात मोठे आणि अटळ सत्य आहे. ज्याने जन्म घेतला आहे, त्याचा मृत्यू निश्चित आहे. हिंदू धर्मातील अठरा महापुराणांपैकी एक असलेल्या ‘गरुड पुराणात’ जीवन, मृत्यू आणि मृत्यूनंतरच्या प्रवासाचे अत्यंत सखोल वर्णन करण्यात आले आहे. आपण आयुष्यभर पैसा, घर, गाडी, मान-सन्मान आणि नातेवाईक जोडण्यात घालवतो. परंतु, जेव्हा प्राण शरीरातून निघून जातात, तेव्हा हे सर्व भौतिक सुख येथेच राहते. स्मशानात चितेवर आपले पंचमहाभूतांनी बनलेले शरीर जळून राख होते. मग मृत्यूनंतर आपल्यासोबत नेमके काय जाते? गरुड पुराणानुसार, शरीर नष्ट झाल्यानंतरही ‘या’ ५ सूक्ष्म गोष्टी आत्म्यासोबत पुढील प्रवासात जातात.