Daily Horoscope

Astrology Zodiac Horoscope Leo Frnd.htm

Notifications

सिंह सिंह
इष्ट मित्र

सिंह राशिवाल्यांचे मेष, कर्क, मिथुन, वृश्चिक व धनु राशीच्या व्यक्तींबरोबर ‍मैत्रीपूर्ण संबंध असतात कारण या सर्व व्यक्ती आपल्या स्वभावाला व इच्छांना समजून आहेत. वृषभ तूळ मकर कुंभ राशिच्या लोकांकडून यांची हानी होऊ शकते. तसेच ‍आपल्या राशितील व्यक्ती आपल्याशी कसे वागतो यावर त्याच्याशी आपले संबंध अवलंबून आहेत. हे लोक आपल्या मित्रांवर खुप प्रेमाने वागतात, त्यामुळे यांची मित्रसंख्या भरपूर असते. मेष राशिच्या लोकांकडून यांना चांगले मार्गदर्शन व प्रेरणा मिळेल.

तुळशीची पूजा करताना कोणत्या परंपरा पाळल्या जातात? धार्मिक महत्त्व जाणून घ्या

तुळशीची पूजा करताना कोणत्या परंपरा पाळल्या जातात? धार्मिक महत्त्व जाणून घ्यातुळशीच्या पूजेसंबंधी परंपरा व नियम सकाळची पूजा व जल अर्पण: दररोज सकाळी स्नान केल्यानंतर तुळशीच्या रोपाला जल अर्पण केले जाते. रोपाची निगा राखणे, मृत पाने काढणे आणि पाणी देणे ही भक्तीची अभिव्यक्ती मानली जाते. संध्याकाळचा दिवा: दररोज संध्याकाळी तुळशीच्या ओट्यासमोर किंवा रोपाजवळ दिवा (तेल किंवा तुपाचा दिवा) लावला जातो, ज्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. प्रदक्षिणा आणि मंत्र जप: तुळशीला फुले, अक्षता वाहून तिची ३ वेळा प्रदक्षिणा घातली जाते आणि मंत्र जप केला जातो. शालिग्राम पूजा: तुळशीच्या रोपासोबत भगवान विष्णूंचे प्रतीक असलेला पवित्र शालिग्राम ठेवून त्यांची पूजा केली जाते.

अज्ञानापोटी लक्ष्मीचा अनादर नका करू! झाडू चौरस्त्यावर फेकण्यामागील अंधश्रद्धा उघड