Astrology Zodiac Horoscope Leo Phy.htm

Notifications

सिंह सिंह
शारीरिक जडण-घडण

सिंह राशिचे लोक हे शारीरिक दृष्ट्या मजबूत असतात. आपल्यात प्रचंड उर्जा व उत्साह असते. जी आपल्या कार्यात प्रतिबिंबिंत होत असते. यांचे डोके मोठे असते. यांच्या गळ्यावर किंवा पोटावर तिळाचा निशाण असतो. तसेच पडल्यामुळे त्यांचे एखादे हाड कमकूवत असते.

श्राद्ध पक्षात कावळ्यालाच का दिले जाते अन्न? अध्यात्म आणि विज्ञानामागील ही रंजक गोष्ट तुम्हाला माहिती आहे का?

श्राद्ध पक्षात कावळ्यालाच का दिले जाते अन्न? अध्यात्म आणि विज्ञानामागील ही रंजक गोष्ट तुम्हाला माहिती आहे का?हिंदू संस्कृतीत भाद्रपद महिन्यातील 'पितृपक्ष' (श्राद्ध पक्ष) अत्यंत पवित्र आणि महत्त्वपूर्ण मानला जातो. या काळात पूर्वजांच्या (पितरांच्या) आत्म्याच्या शांतीसाठी पिंडदानाचा आणि तर्पणाचा विधी केला जातो. श्राद्ध पक्षात बनवलेले अन्न सर्वप्रथम कावळ्याला अर्पण करण्याची जुनी परंपरा आहे आणि कावळ्याने अन्न ग्रहण केले किंवा पिंडाला स्पर्श केला (काकस्पर्श) की पितर तृप्त झाले अशी धारणा असते. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, की या विधीसाठी केवळ कावळ्याचीच निवड का केली गेली? या परंपरेमागे केवळ धार्मिक श्रद्धाच नाही, तर रंजक पौराणिक कथा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन देखील दडलेला आहे.

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रकपितृपक्ष श्राद्ध तिथी २०२६ पौर्णिमा श्राद्ध: २६ सप्टेंबर २०२६ प्रतिपदा श्राद्ध: २७ सप्टेंबर २०२६ द्वितीया श्राद्ध: २८ सप्टेंबर २०२६ तृतीया श्राद्ध: २९ सप्टेंबर २०२६ चतुर्थी / पंचमी श्राद्ध: ३० सप्टेंबर २०२६ षष्ठी श्राद्ध: १ ऑक्टोबर २०२६ सप्तमी श्राद्ध: २ ऑक्टोबर २०२६ अष्टमी श्राद्ध: ३ ऑक्टोबर २०२६ नवमी श्राद्ध (अविधवा नवमी): ४ ऑक्टोबर २०२६ (पती हयात असताना मृत पावलेल्या स्त्रियांचे/सौभाग्यवतींचे श्राद्ध) दशमी श्राद्ध: ५ ऑक्टोबर २०२६ एकादशी श्राद्ध: ६ ऑक्टोबर २०२६ द्वादशी श्राद्ध (संन्यासी श्राद्ध): ७ ऑक्टोबर २०२६ (संन्यास घेतलेल्या किंवा यतींचे श्राद्ध) मघा श्राद्ध: ७ ऑक्टोबर २०२६ त्रयोदशी श्राद्ध: ८ ऑक्टोबर २०२६ (लहान मुलांचे श्राद्ध) चतुर्दशी श्राद्ध (घातचतुर्दशी / शस्त्र-अपघात श्राद्ध): ९ ऑक्टोबर २०२६ (अपघात, शस्त्र, विष किंवा विषम परिस्थितीत मृत पावलेल्यांचे श्राद्ध) सर्वपित्री अमावस्या (अज्ञात तिथी / सर्व पितर श्राद्ध): १० ऑक्टोबर २०२६ (ज्यांची मृत्यू तिथी माहिती नाही किंवा सर्व पितरांचे श्राद्ध)