शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राम मंदिर अयोध्या
Written By
Last Updated : सोमवार, 22 जानेवारी 2024 (09:35 IST)

सीताजींना कधीही मलिन न होणारे वस्त्र देणाऱ्या माता अनुसुया ह्या कोण होत्या ?

आज आम्ही तुम्हाला असा रुचकर किस्सा सांगणार आहोत की, माता सीता यांचे हरण झाल्यानंतर त्यांनी कधीही आपले वस्त्र बदलले नाही त्यानंतर त्या १४ महीने लंका मध्ये राहिल्या. परंतु त्यांचे वस्त्र कधीही मलिन झाले नाहीत. याचे काय रहस्य आहे चला जाणून घेऊया-
 
वनवास काळ या दरम्यान एकदा भगवान श्रीराम आपले बंधू लक्ष्मण आणि माता सीता सह महामुनि अत्री यांच्या आश्रमात पोहचले. महर्षि अत्री यांनी श्रीराम यांचा खूप आदर केला आणि सन्मानपूर्वक त्यांना आपल्या जवळ बसवले. सोबतच श्रीराम यांना भविष्यातील घटनांबद्द्ल सांगितले. ते म्हणाले की हे राम मी वर्षांपासून तुमच्या येण्याची वाट पाहत होतो. त्यानंतर त्यांनी श्रीराम आणि लक्ष्मण यांना अनेक प्रकारच्या अस्त्र आणि शस्त्र बद्द्ल ज्ञान दिले आणि दिव्य आयुध प्रदान केले. 
 
याच दरम्यान महर्षि अत्री यांची पत्नी माता अनुसुया यांनी माता सीतेला पतिव्रत धर्माची दीक्षा दिली. सोबतच वनवासातील कठिन प्रसंगानबद्द्ल अवगत केले. 
 
यानंतर माता अनुसूया यांनी माता सीतेला दिव्य आभूषण आणि वस्त्र उपहार स्वरुप दिलेत व हे सांगितले 
की, हे पुत्री हे वस्त्र आपल्याला भविष्यात खूप कामी पडतील. कारण भविष्यात अशी वेळ येणार आहे तुम्ही कितीतरी दिवस स्नान करू शकणार नाही म्हणून आपण हे वस्त्र आणि आभूषण धारण करून घ्या. यांना धारण केल्याने तुमचे रूप आणि सौंदर्य असेच राहिल आणि हे वस्त्र कधीच मलिन होणार नाही तसेच हे वस्त्र भविष्यात कधीही फाटणार नाही. माता अनुसूया यांच्या सांगण्यावरून माता सीता यांनी हे वस्त्र आणि आभूषण धारण केले. 
 
मान्यता आहे की हे वस्त्र माता अनुसुया यांना देवतांकडून प्राप्त झाले होते. तसेच माता अनुसुया यांना पाच पतिव्रता स्त्री यांपैकी एक मानले जातात तसेच इतर देवतांसोबत भगवान शिव, श्रीहरिविष्णु, ब्रह्मदेवजी हे माता अनुसुया यांना माता मानून त्यांचा आदर करायचे.