बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शुक्रवार, 19 एप्रिल 2019 (11:37 IST)

बालाकोटमध्ये एकही पाकिस्तानी सैनिक किंवा नागरिक मारला गेला नाही - सुषम स्वराज

फेब्रुवारीत भारतीय वायुसेनेनं पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये केलेल्या कारवाईत एकही पाकिस्तानी सैनिक किंवा नागरिक मारला गेला नाही, असं परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी सांगितलं आहे.
 
त्या अहमदाबादमध्ये भाजप महिला कार्यकर्त्यांशी बोलत होत्या. 2014 प्रमाणे यंदाही भाजपचं सत्तेत येईल असंही त्यांनी सांगितलं.
 
"पुलवामा हल्ल्यानंतर आपण सीमेपलीकडे जाऊन हवाई हल्ला केला. हा हल्ला आत्मसंरक्षणासाठी होता, असं आपण आंतरराष्ट्रीय समुदायाला सांगितलं. या हल्ल्यात पाकिस्तानचा एकही नागरिक किंवा सैनिक मारला जाऊ नये असं आम्ही हवाई दलाला सांगितलं होतं," असं त्या म्हणाल्याची माहिती या बातमीत दिली आहे.