रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शुक्रवार, 14 ऑक्टोबर 2022 (12:03 IST)

Rituja Latke's resignation ऋतुजा लटकेंचा राजीनामा मंजूर, अर्ज भरण्याचा मार्ग मोकळा

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतील उमेदवारीचा तिढा आता सुटला आहे, शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या संभाव्य उमेदवार ऋतुजा लटके यांना हायकोर्टानं दिलासा दिला होता.
 
आज 14 ऑक्टोबर रोजी त्यांचा राजीनामा पालिकेने स्वीकारला आहे.
 
ऋतुजा लटकेंचा राजीनामा शुक्रवारी 11 वाजेपर्यंत स्वीकारा असा थेट आदेश कोर्टाने मुंबई महापालिकेला दिला होता.
 
"मला न्याय मिळाला आहे. आता रमेश लटके यांचं काम पुढे घेऊन जाणार," अशी प्रतिक्रिया ऋतुजा लटके यांनी कोर्टाच्या निर्णयानंतर दिली होती.
 
तसंच मला माझ्यावर आरोप कोणी केले हे माहिती नाही. पण हे आरोप चुकीचे आहेत, असा दावासुद्धा त्यांनी मीडियाशी बोलताना केला आहे.
 
ऋतुजा लटके या महानगरपालिकेच्या कर्मचारी आहेत. त्यांचे पती रमेश लटके यांचे निधन झाल्यानंतर आलेल्या पोटनिवडणुकीत त्यांना उमेदवारी देण्याचा निर्णय ठाकरे गटाने घेतलाय.
 
पण त्या कर्मचारी असल्यामुळे त्यांनी राजीनामा देणे आणि तो मंजूर होणे आवश्यक आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपण्यासाठी काही तासांचा अवधी शिल्लक असताना त्यांचा राजीनामाच मंजूर झालेला नाही. पण कोर्टानं आता तो मंजूर करण्याचे आदेश दिले आहेत. आज म्हणजेच 14 ऑक्टोबर रोजी अर्ज भरण्याची मुदत संपणार आहे.
 
दरम्यान मला न्याय मिळाला असं ऋतुजा लटके म्हणाल्या. माझ्यावर कोणी आरोप केले मला माहिती नाही पण मी रमेश लटकेंचे कार्य पुढे घेऊन जाणार असं त्या पुढे म्हणाल्या.
 
तर आमचा उमेदवार निवडून आणणारच असं शिवसेना नेते अनिल परब म्हणाले.

Published By -Smita Joshi