रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By

रेल्वेच्या मालमत्तेचं नुकसान करणाऱ्यांना गोळ्या घाला-राज्यमंत्री

कोणीही रेल्वेच्या मालमत्तेचं नुकसान करत असल्यास त्याला जागेवरच गोळ्या घालण्याच्या सूचना रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी रेल्वे प्रशासनाला दिल्या आहेत. सध्या देशभरात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात आंदोलनं सुरु आहेत. त्या पार्श्वभूमीवर अंगडी यांनी रेल्वे प्रशासनाला कठोर आदेश दिले आहेत. आंदोलनादरम्यान पश्चिम बंगालसह अनेक राज्यांमध्ये आंदोलकांनी रेल्वेच्या संपत्तीचं नुकसान केल्याबद्दल प्रश्न विचारला. त्या प्रश्नाला उत्तर देताना अंगडी यांनी कठोर आदेश स्पष्ट केला.
 
रेल्वे सर्वसामान्य जनतेनं भरलेल्या कररुपी पैशावर चालते आणि एक ट्रेन तयार व्हायला अनेक वर्षं लागतात असं अंगडी म्हणाले. कोणीही दगडफेक केल्यास कठोर कारवाई व्हायला हवी. काही स्थानिक अल्पसंख्याक आणि काही समुदाय कारण नसताना देशाच्या अर्थव्यवस्थेला धक्का पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत असं ते म्हणाले.