शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. बंगाली 'मिष्टी' स्वाद
Written By वेबदुनिया|

बंगाली खिचडी

साहित्य : 100 ग्रॅम तांदूळ, 50 ग्रॅम मूग डाळ, 2 बटाटे, 1 लहान कोबी, 100 ग्रॅम आलं, 3-4 हिरव्या मिरच्या, मीठ चवीप्रमाणे, 1/2 हळद, 1/2 साखर, 2 लाल मिरच्या, 1/4 चमचा जिरं, हिंग, 4 लवंगा, 2 वेलदोडे, 1 तुकडा कलमी, 2 तेजपान, 3 मोठे चमचे तूप. 

कृती : बटाट्याचे सालं काढून त्याचे लांब लांब तुकडे करून घ्यावे. कोबीचे मोठे तुकडे करावेत. आले व हिरव्या मिरच्या बारीक चिरून घ्यावात. तांदळाला स्वच्छ धुऊन टाकावे. डाळींना तूप न घालता गुलाबी होईस्तोर परतून घ्यावे. नंतर त्यात तूप, लाल मिरच्या, जिरं व हिंग सोडून बाकी सर्व साहित्य टाकून 1/2 लीटर पाणी घालून गॅसवर 1/2 तास शिजत ठेवावे. मधून मधून त्याला पळीने हालवत राहावे. शिजून झाल्यावर खाली उतरवून घ्यावे. सर्व्ह करताना तूप गरम करून त्यात वरून लाल मिरच्या, जिरं व हिंगाची फोडणी द्यावी.