सोमवार, 25 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. बॉयोग्राफी
Written By
Last Updated : शुक्रवार, 18 ऑगस्ट 2023 (11:44 IST)

Bajirao Peshwa Jayanti 2023: बाजीराव पेशवांचा जीवन परिचय

bajirao
बाजीरावांचा परिचय: पेशवा बाजीरावांचा जन्म 18 ऑगस्ट 1700 रोजी बालाजी विश्वनाथ आणि राधाबाई यांच्या घरी भट्ट कुटुंबात झाला. त्यांचे वडील छत्रपती शाहूंमहाराजांचे पहिले पेशवे होते. बाजीरावांना चिमाजी आप्पानावाचे  एक धाकटे  भाऊही होते. बाजीराव नेहमी आपल्या वडिलांसोबत लष्करी मोहिमांमध्ये असायचे .
यांच्या पहिल्या पत्नीचे नाव काशीबाई होते, त्यांना 3 अपत्यें  होते- बालाजी बाजीराव, रघुनाथ राव हे  लहानग्या वयातच मरण पावले. पेशवा बाजीरावांच्या दुसऱ्या पत्नीचे नाव मस्तानी होते, ती छत्रसाल राजाची मुलगी होती. बाजीरावांचे तिच्यावर खूप प्रेम होते आणि तिच्यासाठी बाजीरावांनी पुण्याजवळ एक महालही बांधला होता, त्याला 'मस्तानी महल' असे नाव दिले. 1734 मध्ये बाजीराव आणि मस्तानी यांना मुलगा झाला, त्याचे नाव कृष्णराव होते.
 
पेशवा बाजीराव, ज्यांना बाजीराव पहिला म्हणूनही ओळखले जाते, हे मराठा साम्राज्याचे एक महान पेशवे होते. पेशवा म्हणजे पंतप्रधान. ते मराठा छत्रपती राजा शाहूंचे चौथे पंतप्रधान होते. बाजीरावांनी 1720 ते मृत्यूपर्यंत पंतप्रधानपद भूषवले. त्यांना बाजीराव बल्लाळ भट्ट आणि थोरले बाजीराव म्हणूनही ओळखले जाते.
 
पहिले पेशवे बालाजी विश्वनाथ भट्ट हे बाजीरावाचे पिता. वडिलांच्या सानिध्यात बाजीराव बरेच काही शिकले. शिपाई गडी करण्याची खुमखुमी त्यांच्यात लहानपणापासूनच होती. म्हणूनच बालाजी बाजीराव दिल्लीच्या बादशहाची भेट घ्यायला गेले तेव्हा अवघे 19 वर्षाचे बाजीही त्यांच्याबरोबर होते . उत्तर हिंदुस्थानात मराठी सत्तेला हातपाय पसरायच्या किती शक्यता आहे, याचा अंदाज त्या कोवळ्या वयातच बाजींनी घेतला होता. रणधुरंधर असलेल्या पहिल्या बाजीरावाने आपल्या कुशल युद्धनेतृत्वाने छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापलेल्या मराठा दौलतीच्या सीमा उत्तर भारतात विस्तारल्या. वेगवान हालचाल हा यांच्या युद्ध कौशल्याचा महत्त्वाचा भाग होता. यांनी केलेल्या सर्व मोठ्या लढाया जिंकल्या.
 
बालाजींच्या मृत्यूनंतर "पेशवेपदासाठी" दरबारी लोकांत चर्चा होऊ लागली, त्यांत बाजीरावास परंपरागत पेशवेपद देऊ नये असे इतर दरबारी म्हणू लागले. त्याला २ कारणे होती - १) यादवकालीन राजकारणापासून ते ताराराणीपर्यंत राजकारणावर देशस्थांचा पगडा होता ते वर्चस्व पुन: प्रस्थापित व्हावे असे देशस्थांना वाटणे स्वाभाविक होते. 
२) थोरले  बाजीराव हे फटकळ होते, एक घाव दोन तुकडे हा त्यांचा मूळ  स्वभाव होता. मुत्सद्देगिरीपेक्षा त्यांना  समशेर जवळची होती. हे तरुण रक्त आपल्याला भारी पडणार हे लक्षात येताच छत्रपती शाहू महाराजांनी त्यांचा निर्णय बदलावा असे त्यांना सांगितले. मात्र पडत्याकाळात इतर कोणाहीपेक्षा बालाजीने त्यांची जास्त काळजी घेतली होती त्यामुळे छत्रपती शाहू महाराजांचा बाजीरावावर जीव होता. त्यांनी पेशवाईची वस्त्रे व शिक्के कट्यार थोरले  म्हणजेच पहिला बाजीराव यांना दिले.
 
बाजीराव शिपाई होते . आपल्या  40 वर्षांच्या आयुष्यात त्यांनी मोठे  पराक्रम केले. 1720 मध्ये पेशवाई त्यांच्या खांद्यावर आली.त्यांच्या मृत्यूपर्यंत म्हणजे 25एप्रिल 1740पर्यंत त्यांनी 20 वर्षात अनेक लढाया केल्या. त्यांनी एकूण  47 मोठ्या लढाया लढल्या. 
 
संपूर्ण भारतात बाजीरावाच्या समशेरीचा डंका वाजत होता. पहिल्या बाजीरावानेच पुण्याला शनिवारवाडा बांधला आणि साताऱ्याच्या राजगादी इतकेच महत्त्व पुण्याला मिळवून दिले. शनिवारवाड्याबद्दल एक दंतकथा सांगितली जाते - बाजीरावाने त्या ठिकाणी एका सशाला मोठ्या शिकारी कुत्र्याचा पाठलाग करताना बघितले, त्याला त्याचे आश्चर्य वाटले, त्या जागी मग त्याने भुईकोट किल्लाच बांधवून घेतला हाच तो शनिवारवाडा. 
 
बाजीराव पराक्रमी होते. त्यांच्याकडे दिलदारपणा होते, म्हणूनच शाहूमहाराज म्हणत, 'मला जर एक लाख फौज व बाजीराव यात निवड करण्यास सांगितले तर मी बाजीरावाची निवड करेन.' एवढा एकच उद्‍गार बाजीरावांची योग्यता सिद्ध करतो. 
 
 








Edited by - Priya Dixit