सोमवार, 25 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीएमसी चुनाव 2022
Written By
Last Modified: शनिवार, 5 मार्च 2022 (22:35 IST)

मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प विना चर्चा एकमताने मंजुर

मुंबई महापालिकेचा सन २०२२ – २३ या आर्थिक वर्षाकरिता ३ फेब्रुवारी रोजी सादर करण्यात आलेल्या ४५ हजार ९४९ कोटी २१ लाख रुपये एकूण आकारमान असलेल्या आणि ८.४३ कोटी रुपये शिलकीच्या अर्थसंकल्पाला पालिका सभागृहात विना चर्चा एकमताने मंजुरी देण्यात आली आहे.
 
पालिका स्थायी समितीने या अर्थसंकल्पात ६५० कोटींचा फेरफार करून त्यास मंजुरी दिली होती. मात्र भाजपने या ६५० कोटींच्या फेरफारच्या अंमलबाजवणीबाबत आक्षेप घेतल्यानंतर पालिका आयुक्तांनी सदर फेरफार रद्द ठरवला. त्यामुळे या ६५० कोटींच्या फेरफारची अंमलबजावणी आता पालिका निवडणुकीनंतर म्हणजे नवीन नगरसेवक पालिका सभागृहात दाखल झाल्यावर करण्यात येणार आहे. त्यामुळे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांना सदर ६५० कोटी रुपयांचे नगरसेवकांना करता येणार नाही. तसेच, या अर्थसंकल्पातून महापौरांनाही काही कोटींचा निधी वाटप करण्यासाठी मिळत असताना त्यांनाही सध्या सदर निधी उपलब्ध होणार नाही.