शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 23 मे 2023 (21:22 IST)

मिस यूनिवर्सच्या ‘या’चित्रपटाला 20 वर्ष पूर्ण

lara datta
लारा दत्ता हिने अभिनयाने लोकांच्या मनात आपला ठसा उमटविला आहे. बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी लारा दत्ताने मिस यूनिवर्स हा खिताब आपल्या नाववर केला आहे. यानंतर लारा दत्ता ही अभिनयाकडे वळली. लारा दत्ताने ‘अंदाज’हा पहिल्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये  पाऊल टाकले. ‘अंदाज’ या चित्रपट रिलीज होऊन २० वर्ष लोटले आहेत. या पार्श्वभूमीवर लारा दत्ताने इंस्टाग्रामवर (Instagram) भावुक नोट लिहिली आहे.
 
लारा दत्ताने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर या चित्रपटावर एक पोस्ट लिहिली आहे. या चित्रपटात अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि अभिनेता अक्षय कुमार यांनी देखील काम केले आहे. लाराने तिच्या पोस्टमध्ये लिहिले की, अक्षय नेहमीच तिच्यासोबत राहिल्याबद्दल मी त्याची आभारी आहे. आपण दोघी नेहमीच एकमेकींसाठी असणारच आहोत, असे म्हणत तिने प्रियांकाचे कौतुक केले आहे.
 
फोटो शेअर करताना लारा दत्ताने पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले, ‘आणि तशीच….. २० वर्षे झाली. किती अविश्वसनीय, लांबचा प्रवास आहे. सर्वप्रथम, या चित्रपटावर एवढ्या प्रेमाचा वर्षाव केल्याबद्दल मी प्रेक्षक आणि चाहत्यांची सदैव ऋणी राहीन. सुनील दर्शनने मला माझ्या पहिल्या चित्रपटासाठी ऑफर दिली. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अक्षयने मला नेहमीच हसवले आहे. मी तिला फक्त एवढेच म्हणेन की ती कोण आहे.’
Edited by : Ratnadeep Ranshoor