अभिनेता दिलजीत दोसांझ पंजाबी गायिका निशा बानोचं लग्न?
दिलजीत दोसांझ आणि निशा बानो यांच्याबद्दल बातमी आली होती की, दोघांनी लग्न केलं. दरम्यान, आता पंजाबी गायिका निशा बानोने दिलजीतसोबतच्या लग्नाचा फोटो शेअर करून सत्य उघड केले आहे.अभिनेत्रीने या प्रकरणावर आपले मौन तौडले आहे.
दिलजितचे आणि निशाचे एक फोटो सध्या व्हायरल होत असून अभिनेता विवाहित असून त्यांना एक मुलगा आहे. हे फोटो आणि व्हिडीओ शेअर करून गायिका निशा बानो यांनी सत्य उघड केले आहे. निशा ने खुलासा केला आहे की तिने समीर माही सोबत लग्न केले आहे. माझ्या दिलजीत सोबत लग्नाची बातमी खूप व्हायरल होत आहे. लोक माझ्या व्हिडीओ आणि फोटोला टॅग करत आहे. मला विचारत आहे. अरे कोणी मला पण विचार मला कोणाची बायको केलं आणि मला माहित देखील नाही, हे सर्व खोटं आहे.
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, इम्तियाज अली दिग्दर्शित आगामी बायोपिक 'अमर सिंग चमकीला' मध्ये दिलजीत मुख्य भूमिकेत दिसला होता. या चित्रपटात परिणीती चोप्रा देखील आहे. 12 एप्रिल रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
Edited by - Priya Dixit