बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

अरबाज खानने सट्टेबाजी करणे स्वीकारले, मलाइकासोबत घटस्फोटाचा हे एक कारण

मुंबई- अरबाज खानने आयपीएलमध्ये बॅटिंग करणे आणि त्यात तीन कोटी गमावण्याची बाब स्वीकारली आहे. पोलिसांप्रमाणे अरबाजची ही सवय मलाइका अरोरासोबत घटस्फोटाचे एक कारण होते. 
 
अरबाज ठाणे क्राईम ब्रांच ऑफिसमध्ये चौकशीसाठी पोहचले होते. बुकी सोनू जालान समोर बसवून त्यांना 13 प्रश्न विचारले गेले. पोलिसाने अरबाजला विचारले की "काय तुम्हाला माहीत नव्हते की हा आरोपी सट्टा लावतो आणि त्याचे अंडरवर्ल्डशी संबंध आहे?" चौकशीसाठी क्राईम ब्रांचच्या 5 ऑफिसर्सची टीम तयार केली गेली आहे.
 
अरबाज विचारले गेले हे प्रश्न: 
 
सोनू जालान याला कधीपासून ओळखतात आणि त्याच्याशी काय संबंध आहे?
आपण जालान याला पहिल्यांदा कधी भेटला आणि कोणी भेट घडवली?
सोनू सट्टा लावतो आणि आधी याला अटक झालेली आहे हे माहीत होते का?
सोनूचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याची माहीत आहे का?
काय आपल्याला जालानला पैसे दयाचे होते की यासाठी तो आपल्याला धमकी देत होता?
आपल्यात आणि सोनूमध्ये काही व्यवहार झालं असल्यास विस्तारपूर्वक सांगावे?
काय सोनूशी सतत संपर्कात आहात?
आपले सोनू आणि इतर बुकीजसोबत अनेक फोटो आहेत, आपण त्यांना कसे ओळखता?
काय आपण सोनूच्या मदतीने कोणत्याही किंवा आताच्या सामान्यात बॅटिंग केली?
आम्हाला माहीत आहे आपल्यावर सोनूचे 3 कोटी उधार आहे, काय ती रक्कम आपण बॅटिंगमध्ये गमावली?
आपल्या साथीदारांमधून किती लोकं सोनूला ओळखतात? काय आपण कोणत्याही सेलिब्रिटी, मित्र, किंवा नातेवाइकांना त्याच्याशी भेटवले आहे?
काय आपल्या कुटुंबाला आपल्या आणि सोनूच्या नात्याबद्दल माहीत आहे? 
सोनूशी आपल्या शेवटल्या भेटीबद्दल सांगा?