गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

Avengers Endgame Review (अॅव्हेंजर्स एंडगेम चित्रपट परीक्षण) का बघावा जाणून घ्या

11 वर्षापूर्वी टोनी स्टार्कच्या I am Iron Man या शब्दांपासून सुरू झालेल्या या मार्वल स्टुडिओचा प्रवास आता अंतिम टप्प्यावर पोहचला. 11 वर्ष आणि 21 सिनेमा आणि अनेक सूपरहीरोजची कहाणी अॅव्हेंजर्स एंडगेम यावर येऊन थांबेल. वर्ष 2019 मध्ये रीलिझ अॅव्हेंजर्स इन्फिनिटी वॉरमध्ये अर्धे सूपरहीरोज धूळ बनल्यानंतर या सिनेमाबद्दल खूप उत्सुकता होती. जाणून घ्या रिव्यूह
 
कहाणी
अॅव्हेंजर्स इन्फिनिटी वॉर संपली तेथूनच कहाणी सुरू होते. थेनोसने सर्व इन्फिनिटी स्टोन साध्य केल्यावर एका चुटकीत अर्धे विश्व नाहीसे केले. टोनी स्टार्क म्हणजे ऑयरन मॅन स्पेसमध्ये नेब्यूलासोबत एकटा आहे. इतर सूपरहीरोज अजून जवळीक लोकांना गमवण्याच्या दुःखातून बाहेर पडलेले नाहीत. सर्वांना थेनोसची वजपा उगवायचा आहे. पूर्ण कहाणी रोमांचाने परिपूर्ण आहे.
 
दिग्दर्शन
कॅप्टन अमेरिका द विंटर सोल्जर, कॅप्टन अमेरिका सिव्हिल वॉर, अॅव्हेंजर्स इन्फिनिटी वॉरहून एंडगेमपर्यंत रुसो ब्रदर्सने स्वत:ला सिद्ध केले आहे. आता पर्यंत कोणीही दर्शकांना या प्रकारे ब्लॉकबस्टर सिनेमा अनुभव करण्याची संधी दिलेली नाही. प्रत्येक पाउलावर सिनेमा आपल्याला हैराण करेल.
 
मजबूत पक्ष
चित्रपटा तीन तासाचा आहे परंतू एक मिनिटासाठी देखील आपण खुर्चीवरून हालणार नाही. विशेष करून सिनेमाचा क्लाइमॅक्स आपल्याला एकटक बघण्यासाठी भाग पाडेल. एंडगेमचे स्पेशल इफेक्ट मागील सिनेमाहून एक पाऊल पुढेच आहे. बॅकग्राऊंड स्कोअर कमालीचा आहे.
 
कलाकार
सिनेमात प्रत्येकाने आपली कला प्रतिभा सिद्ध केली आहे. रॉबर्ट डाउनी ज्युनियरने तर मागील 11 वर्षापासून आपल्या चाहत्यांना वेड लावलेले आहे. या सिनेमात त्यांनी सिद्ध केले की का टोनी स्टार्कची भूमिका अमर राहील. या सिनेमात कॅप्टन अमेरिका अर्थात क्रिस इवान्सला चांगलेच सीन्स मिळाले आहेत.मेकर्सचे कौतुक करण्यासारखे आहे की त्यांनी क्रिस हेम्सवर्थची भूमिका चांगल्या प्रकारे प्रस्तुत केली. स्कार्लेट जोहान्सन (ब्लॅक विंडो) सर्व अॅव्हेंजर्सला जोडून ठेवण्याचं काम करतो. हॉकआयसोबत त्यांचे सीन उत्तम बनले आहेत. जर्मी रेनरच्या भूमिकेला देखील न्याय मिळाला आहे.
 
मार्क रॅफेलोने हल्क आणि डॉक्टर ब्रूस बॅनर यांचे वेगळे पक्ष मांडण्यात आले आहे. तसेच वॉर मशीनच्या भूमिकेत डॉन चीडलला भरपूर स्क्रीन मिळाली. नेब्यूलाची भूमिका मात्र सर्वात जटिल आहे. अँट मॅनच्या भूमिकेत पॉल रुड आपल्याला हसवेल. अॅव्हेंजर्सची नवीन सदस्य कॅप्टन मार्वलने आपली भूमिका चांगलीच बजावली आहे. या व्यतिरिक्त पेपर पोट्स (ग्वेन्थ पेल्ट्रो) आणि टोनीची केमेस्ट्री आपल्या मागील चित्रपटाची आठवण करून देईल. आता बोलू या व्हिलेन थेनोसबद्दल तर जॉश ब्रोलिनने सिद्ध केले की तो मार्वलचा सर्वोत्तम खलनायक आहे.
 
चित्रपटा का बघावे
अॅव्हेंजर्स एंडगेम इन्फिनिटी वॉरचे सीक्वल आहे परंतू हे चाहत्यांसाठी सर्वोत्तम भेट आहे. आता पर्यंत कोणत्याही फिल्म मेकरने चाहत्यासोबत इतका न्याय केला नसावा. फॅन्सला लक्षात ठेवून चित्रपट तयार केले गेले आहे. चित्रपट आपल्याला हसवेल, इमोशनल करेल, जुन्या आठवणी ताज्या करेल आणि पुढील घटनांप्रती उत्सुकता देखील निर्माण करेल. अपेक्षांवर खरा उतरणारा चित्रपट सोडण्यासारखा मुळीच नाही. तसेच चित्रपट रिलीज जाण्यापूर्वीच बुकिंगने सर्व रेकॉर्ड तोडले आहेत.