गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

जोधपूरला तब्बू सोबत गैर वर्तन

उद्या जोधपूर कोर्टात बहुचर्चित काळवीट शिकार प्रकरणाचा निकाल लागणार आहे. जोधपूरला गेलेली अभिनेत्री तब्बूसोबत सुनावणीसाठी आली असतना तिच्या सोबत गैर वर्तन केले आहे. अभिनेता सलमान खान, सैफ अली खान, अभिनेत्री तब्बू आणि सोनाली बेंद्रे जोधपूरला पोहचले आहेत. जोधपूर सत्र न्यायालयात या प्रकरणी शिक्षा सुनावली जाणार आहे. तब्बूला सुरक्षाकडं घालण्यात आलं. त्यावेळी आरोपीनेही सुरक्षारक्षक असल्याचं भासवून तब्बूभोवती घेराव घातला. याच बहाण्याने त्याने तब्बूला हात लावण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार लक्षात येताच तब्बू भडकली आहे. मात्र वेळीच त्या व्यक्तीला रोखले म्हणून पुढील अनर्थ झाला नाही. वीस वर्षांपूर्वी म्हणजे 1998 मध्ये 'हम साथ साथ है' चित्रपटाचं चित्रीकरण जोधपूरमध्ये सुरु होतं. त्यावेळी सलमानने घोडा फार्म हाऊस आणि भवाद गावात 27-28 डिसेंबरच्या रात्री हरणांची, तर कांकाणी गावात 1 ऑक्टोबरला काळवीटाची शिकार केल्याचा आरोप आहे.