1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 18 नोव्हेंबर 2022 (09:53 IST)

'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या सेटवर 'चंपक चाचांना दुखापत

'तारक मेहता का उल्टा चष्मा' या कॉमेडी शोच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. मिळालेल्या माहितीनुसार , शो चे चंपक चाचा उर्फ ​​अमित भट्ट सेटवर जखमी झाले आहे.त्यांना गंभीर दुखापत झाल्याचे वृत्त आहे. एवढेच नाही तर या दुखापतीमुळे ते काही दिवस या शोमध्ये दिसणार नसल्याचेही बोलले जात आहे.
 
'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या एका सीनमध्ये चंपक चाचाला पळावे लागणार होते. या सीनच्या शूटिंगदरम्यान अमित भट्ट उर्फ ​​चंपक चाचा धावताना तोल जाऊन खाली पडले . पडल्याने अभिनेता अमित भट्ट गंभीर जखमी झाले .
 
डॉक्टरांनी अमित भट्ट यांना पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला आहे. शोच्या निर्मात्यांनीही त्यांना  विश्रांती घेण्यास सांगितले आहे. यामुळेच चंपक चाचा सध्या शोचे शूटिंग करत नाहीयेत. अभिनेत्याच्या दुखापतीची बातमी समोर आल्यापासून त्यांचे चाहते नाराज झाले आहेत. अभिनेत्याच्या लवकर स्वस्थ होण्याची ते  सतत प्रार्थना करत आहे. एवढेच नाही तर शोचे इतर कलाकारही अमित हे लवकरात लवकर बरे  होऊन शोच्या सेटवर परत यावे अशी इच्छा व्यक्त करत आहेत.
 
Edited By - Priya  Dixit