सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 2 फेब्रुवारी 2022 (15:34 IST)

कॉमेडियन सुनील ग्रोवरवर हार्ट सर्जरी, मुंबईत रुग्णालयात दाखल

'द कपिल शर्मा शो'मध्ये 'गुत्थी' आणि 'डॉ. मशहूर गुलाटी' या भूमिका साकारून प्रेक्षकांच्या हृदयात स्थान निर्माण करणारे प्रसिद्ध अभिनेता आणि कॉमेडियन 'सुनील ग्रोव्हर' यांच्या प्रकृतीबाबत मुंबईतून एक मोठी बातमी समोर येत आहे. मुंबईतील एशियन हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये सुनीलवर हृदय शस्त्रक्रिया झाली आहे. रिपोर्ट्सनुसार, त्यांच्या हृदयात ब्लॉकेज होते आणि त्यामुळे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली पण त्यांच्या कामामुळे शस्त्रक्रिया लांबणीवर पडली.
 
सुनील धोक्याबाहेर
विरल भयानी यांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर सुनीलचा फोटो पोस्ट करून याची पुष्टी केली आहे. फोटो शेअर करत त्याने लिहिले की, "अभिनेता सुनील ग्रोव्हरवर मुंबईतील एशियन हॉस्पिटलमध्ये हृदय शस्त्रक्रिया झाली आहे. ते आता बरे होत आहे. सुनीलच्या डॉक्टरांनी सांगितले की, ते आता धोक्याबाहेर आहे आणि त्यांच्या प्रकृतीतही खूप सुधारणा झाली आहे. सुनीलसाठी प्रार्थना करत राहा."
 
सुनील सोशल मीडियावर सक्रिय
काही दिवसांपूर्वीच सुनीलने त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर 'Influencers' वर एक मजेदार पोस्ट शेअर केली होती. विनोदी कलाकार अनेकदा त्यांच्या मजेशीर पोस्ट्सने प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतात. शिमल्याच्या बर्फाळ टेकड्यांमध्ये ते एका वेब सीरिजचे शूटिंगही करत होते, त्याचे काही फोटोही अभिनेत्याने शेअर केले होते.
 
सुनील ग्रोव्हर अॅमेझॉन प्राइमच्या तांडव या वेब सीरिजमध्ये दिसले होते. याशिवाय सुनील ग्रोव्हरला सनफ्लॉवर नावाच्या वेब सीरिजमधील अभिनयासाठी फिल्मफेअर पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.