मंगळवार, 31 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 16 जुलै 2021 (10:45 IST)

बालिका वधू या मालिकेच्या 'दादी सा' सुरेखा सिक्री यांचे निधन

चित्रपट,टीव्ही मालिकांमधून आपल्या अभिनयाचे कौशल्य दाखविणाऱ्या सुरेखा सिक्री यांचे निधन झाले आहे. हृदयविकाराच्या झटक्यामुळे वयाच्या 75 व्या वर्षी त्यांचे निधन झाले.सुरेखा बऱ्याच दिवसांपासून आजारी होत्या.
 
2020 मध्ये सुरेखा सिक्री यांना दुसऱ्यांदा ब्रेन स्ट्रोक आला. तेव्हापासून त्यांची तब्येत खालावत होती. 2018 मध्ये त्यांना अर्धांगवायूचा झटका आला.
 
तीन वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते सुरेखा सिक्री यांच्या निधनामुळे बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. सेलेब्स सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरेखा सिक्री यांना श्रद्धांजली अर्पण करीत आहेत.
 
सुरेखा सिक्री यांनी 1978 साली 'किस्सा कुर्सी का' या चित्रपटाद्वारे डेब्यू केला होता.'बालिका वधू' या टीव्ही कार्यक्रमातून सुरेखा यांना भरपूर ओळख मिळाली. या शोमध्ये त्यांनी दादी सा ​​कल्याणी देवीची भूमिका साकारली होती.त्यांनी 'बधाई हो'या चित्रपटात देखील उत्कृष्ट भूमिका साकारली होती.