लता मंगेशकरांच्या तब्येतीविषयी कुटुंबीयांनी दिली ताजी माहिती
प्रसिद्ध गायिका, भारतरत्न लता मंगेशकर यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये ICU मध्ये उपचार सुरू आहेत. लतादीदींसाठी प्रार्थना करा, असं त्यांच्या कुटुंबीयांनी म्हटलं आहे.
काही वेळापूर्वी जारी केलेल्या पत्रकात लतादीदींच्या कुटुंबीयांनी म्हटलं आहे, "सगळ्यांना आवाहन आहे की, कुठल्याही चुकीच्या बातम्यांना थारा देऊ नका. लतादीदींवर डॉ. प्रतित समदानी आणि त्यांची टीम आयसीयूत उपचार करत आहे. लतादीदी लवकरात लवकर बऱ्या होऊन घरी परततील, अशी प्रार्थना करूया.
लतादीदींवर उपचार करणारे जनरल फिजीशियन डॉ. प्रतित समदानी यांनी लता मंगेशकर यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर बीबीसी मराठीला माहिती दिली होती.
डॉ. प्रतित समदानी यांनी सांगितलं होतं की, "लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झालीय. त्यांना न्यूमोनिया झालाय. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत."
डॉ. प्रतित समदानी आणि त्यांचं पथक लतादीदींवर उपचार करत आहे