शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: रविवार, 16 जानेवारी 2022 (11:33 IST)

Happy Birthday Siddharth Malhotra :सिद्धार्थ मल्होत्रा ​​आज 37 वा वाढदिवस साजरा करत आहे

सिद्धार्थ मल्होत्रा ​​आज त्याचा 37 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यांचा जन्म 16 जानेवारी 1985 रोजी दिल्लीतील एका पंजाबी हिंदू कुटुंबात झाला.  सिद्धार्थ एक अभिनेता आणि बॉलिवूड चित्रपटाचा माजी मॉडेल आहे. सिद्धार्थने वयाच्या 18 व्या वर्षांपासून मॉडेलिंग ने आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. पण त्यावर तो समाधानी नसल्याने त्याने मॉडेलिंग सोडले. 
2010 मध्ये 'माय नेम इज खान ' या चित्रपटात करण जोहरचा सहाय्यक  दिग्दर्शक म्हणून काम केले. सिद्धार्थ चे वडील सुनील मल्होत्रा हे मर्चंट नेव्हीमध्ये कॅप्टन होते आणि आई रिमा मल्होत्रा गृहिणी आहे. सिद्धार्थने 2012 मध्ये करण जोहरच्या 'स्टुडंट ऑफ द इयर ' चित्रपटात प्रमुख भूमिका करत अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केले. या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट पुरुष पदार्पण नामांकनासाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.
यानंतर त्याने 2014 मध्ये 'हसी तो फसी', एक व्हिलन, कपूर अँड सन्स, इत्तेफाक मरजावां, बार बार देखो,ब्रदर्स, शेरशाह, जबरिया जोडी यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले. सिद्धार्थ मल्होत्राच्या आगामी चित्रपटांच्या यादीत मिशन मजनू ,थँक गॉड, योद्धा यांचा  समावेश आहे. 
सिद्धार्थ मल्होत्राला आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. बिग स्टार एंटरटेनमेंट अवॉर्ड्स, फिल्मफेअर ग्लॅमर आणि स्टाइल अवॉर्ड्सचा समावेश आहे .