गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 20 डिसेंबर 2019 (11:54 IST)

हसीन दिलरुबाचे पहिले पोस्टर रिलीज

रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या 'हसीन दिलरुबा' चित्रपटाचा पहिला पोस्टर प्रदर्शित करण्यात आला आहे. चित्रपटात अभिनेत्री तापसी पन्नू मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. परंतु चित्रपटाच्या पोस्टरमध्ये तापसीच्या तोंडावर पडदा टाकण्यात आला आहे. आता चित्रपटात तापसीची वेशभूषा आणि तिचा मेकअप कसा असेल, याची उत्कंठा आता चाहत्यांच्या मनात शिगेला पोहोचली आहे. 
 
पोस्टरमध्ये एका मुलीचे पाय  रक्तात आहेत. तिच्या हातात लाल रंगाच्या बांगड्यादेखील आहेत. त्याचबरोबर रक्ताने भरलेला चाकूदेखील तिच्या शेजारी असल्याचे दिसत आहे. तिच्या पाठी एक 'वहशी' नावाचं पुस्तकसुद्धा आहे. 'हसीन दिलरुबा' चित्रपट 18 सप्टेंबर 2020 रोजी रूपेरी पडद्यावर दाखल होणार आहे. चित्रपटामध्ये तापसी अभिनेता विक्रांत मॅसीसोबत स्क्रिन शेअर करणार आहे. तर या चित्रपटाचं दिग्दर्शन विनी मॅथ्यू करणार आहेत.
खुद्द तापसीने चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडिावर पोस्ट करत कॅप्शनमध्ये 'हसीन दिलरूबा' गाण्यच्या ओळी लिहिल्या आहेत. यंदा तापसी 'मिशन मंगल' आणि 'बदला' चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला आली होती.