शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 7 एप्रिल 2020 (10:55 IST)

कतरिना ने सांगितलं सलमानच्या लग्नाबद्दल, व्हिडीओ तुफान व्हायरल

मोस्ट एलिजिबल बॅचलर ऑफ बॉलीवूड ज्याच्या लग्नाची सर्वच आतुरतेने वाट बघत आहे. होय आम्ही बोलत आहोत सलमान खानबद्दल. सलमानचं नाव अनके अभिनेत्रींशी जोडले गेले असून कतरिना कैफ त्याची अगदी जवळची मैत्रीण असल्याचं दिसून येतं. सध्या सोशल मीडियावर एक जुना व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे ज्यात कतरिना सलमानच्या लग्नाबद्दल बोलत आहे.  
 
हा व्हायरल व्हिडीओ सलमानच्या ‘भारत’ चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यानचा आहे. जेव्हा सलमान आणि कतरिना ‘कपिल शर्मा शो’ मध्ये आले होते. या दरम्यान कपिलने कतरिनाला सलमानचं लग्न कधी होणार असा प्रश्न विचारल्यावर कतरिनाचं उत्तर ऐकून सर्वांना मजा येतो. ती म्हणते या प्रश्नाचे उत्तर केवळ दोन लोकांकडे आहे. एक तर भगवान आणि दुसरा सलमान.
 
सोनी टीव्हीने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर हा जुना व्हिडीओ शेअर केला आहे.