गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 29 जुलै 2022 (14:29 IST)

Koffee with Karan 7 : कॉफी विथ करणमध्ये आमीर-करीना दिसणार, सेटवरून लीक झाले फोटो

सुपरस्टार आमिर खान त्याच्या आगामी 'लाल सिंग चड्ढा' या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहे. या एपिसोडमध्ये तो करण जोहरच्या प्रसिद्ध शो 'कॉफी विथ करण'मध्ये सहभागी होणार आहे. या शोमध्ये आमिर त्याची सह-अभिनेत्री करीना कपूर खानसोबत दिसणार आहे. अलीकडेच या शोचे पडद्यामागचे फोटो समोर आले आहेत जे चर्चेचा विषय बनले आहेत. फोटो पाहून लोक या एपिसोडची आतुरतेने वाट पाहत आहेत.
 
गेल्या काही दिवसांपासून या शोमध्ये आमिर आणि करीना येणार असल्याची चर्चा होती. पण नुकतेच या दोघांचे फोटो समोर आल्यानंतर हे स्पष्ट झाले आहे की दोघेही लवकरच करणच्या शोमध्ये त्यांच्या चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसणार आहेत. व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये आमिर आणि करीना शोच्या सेटवर शूटिंग करताना दिसत आहेत. दुसऱ्या छायाचित्रात करण जोहरही पोज देताना दिसत आहे.
 
मीडिया रिपोर्ट्सनुसार, आमिर खान या शोमध्ये अनेक मुद्द्यांवर आपलं मत मांडताना दिसणार आहे. या शोमध्ये आमिर साऊथ आणि बॉलीवूड चित्रपटांबद्दलही बोलताना दिसणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
 
करणचा हा शो सध्या खूप चर्चेत आहे. या शोचे आतापर्यंत 3 एपिसोड आले आहेत. 28 जुलै रोजी येणाऱ्या नवीन एपिसोडमध्ये, साऊथ स्टार विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे होस्ट करण जोहरच्या कठीण प्रश्नांची उत्तरे देताना दिसणार आहेत.