सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 11 जून 2018 (08:49 IST)

पुलं मोठ्या पडद्यावर, मांजरेकर बनवणार चित्रपट

लेखक, गीतकार, संगीतकार, गायक, दिग्दर्शक, अभिनेते असं अष्टपैलू व्यक्तिमत्व लाभलेले पु. ल. देशपांडे यांच्या साहित्यकृतींवर आजवर बरीच नाटकं आणि चित्रपट झालेत. पण आता पुलंचीच जीवनगाथा मोठ्या पडद्यावर येणार आहे. निर्माता- दिग्दर्शक महेश मांजरेकर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणणार आहेत.
 
‘फाळकेज् फॅक्टरी’या नावाने चित्रपट निर्मितीची नवी कंपनी महेश मांजरेकर यांनी सुरू केली आहे. या बॅनरअंतर्गत हा पहिला चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ‘भाई.. व्यक्ती की वल्ली’या चित्रपटाच्या माध्यमातून ते पुलंचा जीवनपट उलगडून दाखवणार आहेत. यावर्षी पुलंच्या जयंतीदिनी म्हणजेच ८ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.