बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 17 जुलै 2020 (11:27 IST)

नेटफ्लिक्स भारतीय प्रेक्षकांसाठी तब्बल १७ नवे चित्रपट आणत आहे

नेटफ्लिक्स भारतीय प्रेक्षकांसाठी आता तब्बल १७ नवे चित्रपट घेऊन येत आहे. नेटफ्लिक्सने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट करुन याबाबत आपल्या चाहत्यांना माहिती.
 
सर्वात प्रथम जान्हवी कपूरचा ‘गुंजन सक्सेना’ हा चित्रपट येत्या १२ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. त्यानंतर संजय दत्तचा ‘टोरबाज’, भूमि पेडनेकरचा ‘डॉली किट्टी और वो चमकते सितारे’, नवाजुद्दन सिद्दीकीचा ‘रात अकेली है’ आणि ‘सीरियस मॅन’, राजकुमार रावचा ‘लूडो’, बॉबी देओलचा ‘क्लास ऑफ 83’, तब्बूचा ‘अ सूटेबल बॉय’, काजोलचा ‘त्रिभंगा’, ‘गिन्नी वेड्स सन्नी’, ‘मिसमॅच्ड’, ‘एके वर्सेज एके’, ‘बॉम्बे रोज’, काली खुई’, ‘भाग बीनी भाग’, ‘बॉम्बे बेगम्स’ आणि ‘मसाबा मसाबा’ हे चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहेत.