शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 13 जुलै 2020 (07:44 IST)

‘कसौटी जिंदगी..’ मालिकेतील मुख्य अभिनेत्यालाही कोरोना

टेलिव्हिजन अभिनेता पार्थ समथान हा कोरोना पॉझिटिव्ह (Parth samthaan corona positive)आहे. गेल्या काही दिवसांपासून मालिकांच्या शूटिंगला काही अटींसह परवानगी देण्यात आली आहे. बालाजी प्रॉडक्शन कसौटी जिंदगी की 2 मध्ये तुम्ही त्याला पाहू शकता. शोमध्ये तो अनुरागची भूमिका साकारत आहे. क्लिक निक्सोन स्टुडिओतील शूटिंग थांबविण्यात आले आहे. आणि शो स्टार कास्ट आणि क्रू यांना वेळापत्रकानुसार बीएमसीकडे येण्यास सांगण्यात आले आहे. कोरोनासाठी सर्व सदस्यांची चाचणी घेण्यात येणार आहे.
 
क्लिक निक्सोन स्टुडिओमध्ये बालाजी प्रोडक्शन (Balaji Production)अंतर्गत कसौटी जिंदगी की (series kasauti zindagi shooting), कुमकुम भाग्य(Kumkum Bhagya), पवित्र भाग्य यांची शूटिंग सुरू होतं. आणि कसौटी जिंदगी की (Parth samthaan corona positive) शो स्टार कास्ट आणि इतरांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे.
 
सध्या अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan corona positive)आणि अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan corona positive) यांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ऐश्वर्या राय आणि आराध्या यांची सौम्य लक्षणे असल्याने त्यांच्यावर घरीच उपचार केले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय जया बच्चन आणि त्यांच्या मुलीची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे. मात्र त्याचे चारही बंगल्यांना सॅनिटाइझ करण्यात आलं आहे.